आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

चिनी अंतराळवीराचे अवकाशातून व्याख्यान

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बीजिंग - पृथ्वीप्रमाणे घड्याळाचा दोलक अवकाशात का राहू शकत नाही? कोणते तत्त्व त्याला अडथळा आणणारे ठरते, यासह अंतराळातील जीवनाविषयी माहिती देणारे चिनी महिला अंतराळवीराचे व्याख्यान उद्बोधक ठरले. कुतूहल शमवणारी माहिती सरळ अवकाशातून मिळाल्याने सुमारे सहा कोटी चिनी विद्यार्थ्यांसाठी हे व्याख्यान विलक्षण आनंद देणारे ठरले.


निमित्त होते वँग यापिंग यांच्या व्याख्यानाचे. वँग चीनच्या दुस-या महिला अंतराळवीर आहेत. देशाच्या अवकाश मोहिमेवर असलेल्या वँग यांनी गुरुवारी 45 मिनिटांचे व्याख्यान दिले. त्यांनी अवकाशातून विद्यार्थ्यांशी संवाद साधला. त्यांच्यासमवेत आणखी दोन पुरुष अंतराळवीर होते. त्यांनी न्यूटनच्या गुरुत्वाकर्षणाचा सिद्धांत प्रत्यक्ष प्रयोगातून स्पष्ट करून दाखवला.
वँग यांनी पृथ्वीप्रमाणे दोलक अवकाशात का राहू शकत नाही, हे स्पष्ट केले. त्यासाठी त्यांनी तारांनी आवळलेला चेंडू एका धातूच्या ताटलीवर ठेवला आणि तो पृथ्वीवरील दोलकासारखा का फिरत नाही, हे दाखवले. हा दोलक गोलाकार फिरत होता. अवकाशात गुरुत्वाकर्षण शक्ती नसल्याने हे घडून येते, हे त्यांनी प्रात्यक्षिकाद्वारे दाखवून दिले. व्याख्यानाचे थेट प्रक्षेपण करण्यात आले होते. त्यामुळे व्याख्यानाचा आनंद देशातील 330 प्राथमिक, माध्यमिक शाळांतील सुमारे 6 कोटी विद्यार्थ्यांनी घेतला. दरम्यान,चीनच्या अगोदर अमेरिकेच्या ख्रिस्टा मॅकऑलिफ (37) यांनी अंतराळातून पहिल्यांदा व्याख्यान दिले होते, परंतु 28 जानेवारी 1986 मध्ये त्यांच्यासह सहा अंतराळवीरांचा अपघातात मृत्यू झाला होता.


तिआंगाँग-1 मधून संवाद
वँग यांनी आपल्या व्याख्यानातून विद्यार्थ्यांशी प्रभावीपणे संवाद साधला. चीनच्या अंतराळातील प्रयोगशाळेला टिआंगाँग-1 असे नाव देण्यात आले आहे. याच प्रयोगशाळेतून वँगने व्याख्यान दिले. हॅलो, एव्हरीवन. आय अ‍ॅम वँग यापिंग. आय विल होस्ट द लेक्चर टुडे, अशी वँग यांनी कॅमे-याकडे पाहत सुरुवात केली होती.