आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

चिनी अंतराळवीर अवकाशात झेपावले; कायमस्वरूपी अंतराळ स्थानक उभारणार

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बीजिंग - सन 2020 पर्यंत कायमस्वरूपी अंतराळ स्थानक बांधण्याच्या महत्त्वाकांक्षी मोहिमेतील एक भाग म्हणून चीनचे तीन अंतराळवीर मंगळवारी अवकाशात झेपावले. मंगोलियातील अंतराळ केंद्रावरून शेनझोऊ -10 हे यान अवकाशात झेपावले. या मोहिमेत महिला अंतराळवीराचाही समावेश आहे. ही अंतराळवीर चीनमधील विद्यार्थ्यांना थेट अंतराळातून शिकवणार आहे.


मंगोलियातील गोबी वाळंवटात असलेल्या जिउक्वान उपग्रह केंद्रावरून शेनझोऊ - 10 (दैवी विमान) यानाचे उड्डाण पाहण्यासाठी राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग उपस्थित होते. 2 एफ कॅरियर रॉकेटसह शेनझोऊच्या उड्डाणाचे थेट प्रक्षेपणही करण्यात आले.यान यशस्वीपणे अवकाशात झेपावताच जिनपिंग यांनी शास्रज्ञांशी शेकहँड करुन अभिनंदन केले. चीनी नागरिकांना अभिमान वाटावा अशी कर्तबगारी आपण बजावली आहे अशा शब्दात त्यांनी शास्रज्ञांबद्दल गौरवोद्गार काढले.मानवासह चीनी यानाची यापूर्वीची मोहिम 13 दिवसांची होती.मोहिमेत वॅँग यापिंग ही 33 वर्षीय महिला अंतराळवीर सहभागी झाली असून अंतराळ मोहिमेवर जाणारी ती दुसरी महिला ठरली आहे.गतवर्षी लीयु याँग ही महिला मोहिमेत सहभागी झाली होती. 15 दिवसांच्या यंदाच्या मोहिमेचे नेतृत्व नी हायशेंग यांच्याकडे असून झँग झिओगुआंग हे तिसरे सदस्य आहेत.


मोजक्या देशांत समावेश: मानवासह दोन पेक्षा अधिक अंतराळ मोहिम राबवणा-या मोजक्या देशात चीनचा समावेश झाला आहे.चीनची ही पाचवी मानवी अवकाश मोहिम आहे.यापूर्वी केवळ अमेरिका व रशिया यांनीच दोनपेक्षा अधिकवेळा आपल्या अंतराळवीरांना अंतराळ स्थानकात पाठवले आहे.


शाळकरी विद्यार्थ्यांना शिकवणार
तिआनगाँग-1 अंतराळ स्थानकातून प्रथमच व्हिडिओ फीड द्वारे प्राथमिक व माध्यमिक शाळांमधील विद्यार्थ्यांना थेट अंतराळातून वँग ही न्यूटनच्या गुरुत्वाकर्षणाच्या नियमाचे धडे देणार असून विद्यार्थी,शिक्षकांशीही संवाद साधणार आहे.


स्वतंत्र अंतराळ स्थानक
चीनला स्वत:चे स्वतंत्र अंतराळ स्थानक उभारायचे आहे. त्यासाठी दरवर्षी अंतराळवीरांना विद्यमान तिआनगाँग -1 या प्रायोगिक अंतराळ स्थानकात पाठवण्यात येणार आहे. सध्या अवकाशातील मीर आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकाची मोहीम सन 2020 पर्यंत संपेल.