आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Chinese Biggest Political Case Judgement: Bo Get Life Prisonment

चीनच्या सर्वात मोठ्या राजकीय खटल्‍याच्या निकालात भ्रष्ट बो शिलाईंना जन्मठेप

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जिनान / बीजिंग - चीनमधील सर्वात मोठय़ा राजकीय खटल्यात सत्ताधारी कम्युनिस्ट पार्टीचे ज्येष्ठ नेते बो शिलाई यांना भ्रष्टाचार आणि अधिकारांचा गैरवापर केल्याच्या गुन्ह्यात चीनच्या न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा ठोठावली. या शिक्षेमुळे अध्यक्ष जिनपिंग यांच्या नेतृत्वाखाली नव्या सुधारणावादी विचारसरणीला खीळ घालण्याच्या प्रयत्नात असलेल्या माओवादी गटाला जबर हादरा बसल्याचे मानण्यात येत आहे.

पूर्व चीनमधील शेडाँग प्रांतातील जिनान इंटरमीडिएट कोर्टाने कम्युनिस्ट पक्षाच्या पॉलिटब्युरोचे माजी सदस्य बो शिलाई यांना जन्मठेपेची शिक्षा ठोठावली आणि चीनमधील सर्वात मोठय़ा राजकीय खटल्यावरील पडदा खाली आला. बो शिलाई हे चीनमधील करिश्मा असलेले नेते होते. कम्युनिस्टांच्या दशकातून एकदा होणार्‍या नेतृत्व बदलामध्ये गेल्या वर्षी त्यांचे नाव आघाडीवर राहण्याची शक्यता होती. परंतु अधिकारांचा गैरवापर व भ्रष्टाचाराच्या आरोपामुळे चॉग्किंग शहर कम्युनिस्ट पक्षाच्या अध्यक्षपदावरून त्यांची हकालपट्टी करण्यात आली होती. त्यामुळे नेतृत्वाच्या स्पर्धेत येण्याची त्यांची हातची संधी हुकली. त्यांचे वडील बो ईबो यांनाही त्यांच्या उदारमतवादी विचारसरणीमुळे कम्युनिस्ट पक्षाचे संस्थापक माओ झेडांग यांनी अनेकदा तुरुंगात टाकले होते.


बो यांच्या पत्नीलाही शिक्षा
बो यांची पत्नी गू केलाई यांना ब्रिटिश अधिकारी नेल हेवूड हत्या प्रकरणात मृत्युदंडाची शिक्षा ठोठावण्यात आली आहे. परंतु तूर्त तरी त्यांची ही शिक्षा स्थगित ठेवण्यात आली आहे.

शिलाई यांना शिक्षा झालेल्या अन्य वरिष्ठ नेत्यांप्रमाणेच बीजिंगमधील किचिंग तुरुंगात जन्मठेप भोगावी लागण्याची शक्यता आहे. येथे त्यांना सर्व अत्याधुनिक सुखसुविधा दिल्या जातील. त्यांना कैद्यांचे कपडे घालावे लागणार नाहीत. खायला मिष्टान्नही दिले जाईल. या तुरुंगातील सेल 20 चौरस मीटर मोठे असून त्यात वैयक्तिक शौचालयही आहे. हा तुरुंग चिनी जनतेसाठी नुकताच खुला करण्यात आला होता.


हायकोर्टात अंतिम निर्णय
शिलाई यांनी सर्व आरोप फेटाळून लावले आहेत. या निकालाच्या विरोधात ते शेडाँग प्रांताच्या उच्च् न्यायालयात अपील करणार आहेत. तेथील निकालच अंतिम असेल.

फाइव्ह स्टार तुरुंग
या गुन्ह्यात झाली शिक्षा
0शिलाई यांनी एका उद्योगपतीकडून 1.1 दशलक्ष युआन थेट लाच स्वीकारली. त्यांची पत्नी गु शिलाई आणि मुलगा बो गौगुआ यांनी अन्य एका उद्योगपतीकडून मोठी रक्कम आणि 19.33 युआनची मालमत्ता स्वीकारली असल्याचे त्यांना माहीत होते.
0शिलाई यांनी कम्युनिस्ट पक्षाच्या डालियान शहराचे प्रमुख, लिओनिंग प्रांताचे गव्हर्नर आणि चीनचे वाणिज्य मंत्री असल्याचा फायदा घेऊन इतरांना लाभ पोहोचवला.

0डालियान शहराचे प्रमुख असताना 20.44 दशलक्ष युआन म्हणजेच सुमारे 3.3 दशलक्ष डॉलरची लाच स्वीकारल्याच्या गुन्ह्यात शिलाई दोषी ठरले. त्यांनी डालियान शहराचे मोठय़ा प्रमाणावर आधुनिकीकरण करून हे शहर जगातील ‘हाय-प्रोफाइल’शहरांच्या यादीत नेऊन बसवले.

न्यायालय म्हणाले..
बो शिलाई हे राष्ट्राचे एक नोकर होते. त्यांनी त्यांच्या अधिकारांचा गैरवापर केला. त्यामुळे देशाचे आणि देशातील नागरिकांचे मोठे नुकसान झाले..ही अतिशय गंभीर बाब आहे.


चेहर्‍यावर स्मितहास्य
न्यायमूर्ती निकालपत्र वाचत असताना बो शिलाई मात्र हसत होते. जन्मठेप ठोठावल्यानंतर हातात बेड्या ठोकलेल्या शिलाई यांना दोन धिप्पाड पोलिसांनी त्यांच्या खांद्याला पकडून नेले.