आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Chinese Billionair Who Built Sixth European Forts

चिनी अब्जाधीशाने बांधले सहा युरोपियन किल्ले, आण‍खी शंभर बांधण्‍याची योजना

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
59 वर्षीय लियू चोंगहुआ हे चीनमधील मोठे व्यावसायिक आहेत. युरोपियन स्थापत्यशास्त्राचा त्यांच्यावर खूप प्रभाव आहे. कोट्यवधी रुपये खर्च करून त्यांनी चाँगक्विंग शहरात सहा युरोपियन शैलीतील किल्ले बांधले आहेत. मात्र, त्यांचे ध्येय आणखी मोठे आहे. असे 100 किल्ले बांधण्याची त्यांची इच्छा आहे; पण या किल्ल्यांत कुणालाही राहता येऊ नये, असेच बांधले आहेत. यापैकी एक ग्रे स्टोनपासून बांधला आहे. हा ब्रिटनमधील विंडसर कॅसलची प्रतिकृती आहे. किल्ल्याच्या चहुबाजूंनी गव्हाची शेती आहे. इतर किल्ल्यांमध्ये अल्लाउद्दीनच्या कार्टून चित्रपटातील पांढरा किल्ला आणि 19व्या शतकातील बव्हॅरियन राजा लुडविगचा ‘न्यूशवेंस्टिन’चा समावेश आहे. किल्ला बांधण्यापूर्वी ते अनेक पुस्तके वाचून डिझाइन पसंत करतात. लियू यांना लहानपणापासूनच अशा किल्ल्यांची आवड होती. गरिबीत बालपण गेलेल्या लियू यांनी लोकांना भोजन देण्यास सुरुवात केली. नंतर हाच त्यांचा मोठा व्यवसाय झाला. आजही ते गरिबांना जेवू घालतात. चाँगक्विंग प्रशासनाला त्यांचा हा छंद पटत नाही. अनेकदा त्यांच्या कलाकृती तोडण्याचाही प्रयत्न करण्यात आला आहे. तसेच त्यांना जिवे मारण्याच्या धमक्याही मिळत असतात. तरीही ते छंदापायी झटत आहेत.
odditycentral .com