आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Chinese Bride Transported To Her Wedding On A Cow

चीनी वधूने पूर्ण केली पतीची इच्छा, म्हशीवर बसून पोहोचली मंडपात

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जगभरात वधू आर्थिक स्थितीप्रमाणे महागड्या गाड्या, हेलिकॉप्टर किंवा डोलीमध्ये बसून सासरी जातात. मात्र चीनमधील एक वधू या सर्व प्रथांना नाकारत चक्क म्हशीवर बसून सासरी गेली. म्हशीवर बसलेली ही वधू पाहण्यासाठी लोकांनी रस्त्याच्या दुतर्फा गर्दी केली होती.
37 वर्षीय झेंग यांची त्याच्या वधूने नायिकेप्रमाणे म्हशीवर बसून यावे अशी इच्छा होती. झेंग फू चीनी लोककथेच्या सुंदर नायिकेच्या दंतकथेने प्रभावित आहेत. चीनमध्ये व्हॅलेंटाइन डेच्या दिवशी म्हशीवर बसलेल्या मुलीचा फोटो खूप विकला जातो. झिंगची ही इच्छा पूर्ण करण्यासाठी त्याती वधू यि यांग (35) पांढ-या रंगाचा गाऊन घालून म्हशीवर बसून सासरी पोहोचली
काय आहे ही चीनी दंतकथा
चीनी दंतकथेनूसार निऊलांग या युवकाला एका म्हशीने सांगितले होते, की स्वर्गातील राजाच्या मुली म्हशीवर बसून आंघोळीसाठी पृथ्वीवर येतात. त्या म्हशीने निऊलांगला ती जागा दाखवली ज्या ठिकाणी त्या मुली आंघोळ करत असत. निऊलांगला राजाची सर्वात छोटी मुलगी आवडली तेव्हा त्याने तिचे कपडे लपवून ठेवले. ही छोटी मुलगीच आकाशात इंद्रधनुष्य तयार करत असे. त्या छोट्या मुलीने कपडे परत मागितले तेव्हा निऊलांगने तिला लग्न करशील तरच कपडे परत करेन अशी अट घातली. तिने निऊलांग सोबत लग्न करण्यास होकार दिला.
छोटी राजकुमारी राजी झाली आणि तिने त्याच्या सोबत लग्न केले. राजाला ही गोष्ट कळल्यानंतर तो पृथ्वीवर आला आणि मुलीला परत घेऊन गेला. निऊलांगने राजाला खूप विंनती केली. तेव्हा राजाने वर्षातून दोनदा भेटण्याची परवानगी दिली. तेव्हापासून छोटी राजकुमारी म्हशीवर बसून निऊलांगला भेटायला येते अशी अख्यायिका सांगितली जाते.
पुढील स्लाइडवर पाहा म्हशीवर बसून मंडपात पोहोचलेल्या यांगचे काही फोटो...