(फोटो-चीनच्या हुनान प्रांतामधील पिंगजँगमध्ये तयार करण्यात आलेला काचेचा पुल)
पिंगजँग – दक्षिण चीनच्या हुनान प्रांतामधील पिंगजँगमध्ये दरीवर काचाचा पुल बनवण्यात आला आहे. 300 मीटर लांब असलेला हा पुल पारदर्शी काचांपासून तयार करण्यात आला आहे. 180 मीटर उंचीवर हा पुल पार करताना पर्यटकांनी खाली दरीमध्ये पाहताच त्यांना भोवळ येते.
विशेष प्रशिक्षित कर्मचा-यांना सोबत घेऊन हा पुल बनविण्यात आला आहे. शिवाय त्यावर सुरक्षारक्षकही तैनात केले आहेत. पर्यटकांच्या हिम्मतीची ख-या अर्थाने या पुलावर कसोटी लागते. एक प्रकारे हा पुल पर्यटकांची परीक्षाच घेतो.
पुढील स्लाइडवर पाहा, काचाच्या पुलाची भन्नाट छायाचित्रे..