आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Chinese Find Marriage Patners, Sex Ratio Decline

चिनी उपवरांचे परदेशात वधूसंशोधन,स्त्री-पुरुष गुणोत्तर प्रमाण बिघडले

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बीजिंग - महासत्ता होण्याची स्वप्ने पाहणा-या चीनमध्ये स्त्री-पुरुष गुणोत्तर प्रमाण बिघडले आहे. त्यामुळे देशातील कोट्यवधी उपवरांची मोठीच गोची झाली आहे. त्यावर चिनी तरुणांनी जोडीदार मिळवण्यासाठी आपल्या परीने तोडगा शोधला आहे. सुमारे 3 कोटी 40 लाख चिनी पुरुष परदेशात वधूचा शोध घेण्याच्या कामाला लागले आहेत.
चीनमध्ये 69 कोटी 70 लाखांहून अधिक पुरुष, तर महिलांचे प्रमाण सरासरी 66 कोटी 30 लाख एवढे आहे. 2013 मधील ही आकडेवारी आहे. याचाच अर्थ महिलांपेक्षा पुरुषांची संख्या सरासरी 3 कोटींहून अधिक आहे, असे चीनच्या
नॅशनल ब्युरो ऑफ स्टॅटिस्टिक (एनबीएस) या संस्थेकडून जाहीर करण्यात आले आहे. हाँगकाँग आणि मकाऊ वगळून चीनची एकूण लोकसंख्या 1.36 अब्ज (2013) एवढी आहे, असे एनबीएसकडून सांगण्यात आले.
सरकारही जबाबदार
चीनमधील साम्यवादी सरकारने गेली तीन दशके एक कुटुंब, एक मूल असे धोरण अतिशय कडकपणे राबवले. त्यामुळे वंशाला पुढे नेणा-या मुलाची मागणी वाढली. त्यातून चाचणी करून गर्भपाताकडे नागरिकांचा कलही वाढला.
बचत वाढवण्याचा दबाव
चीनमधील स्त्री-पुरुषांच्या असमानतेचा परिणाम सामाजिक स्थितीवरदेखील झाला आहे. त्यामुळे चिनी तरुणाचा विवाह करायचा झाल्यास त्याच्या आई-वडिलांना मोठ्या प्रमाणात बचत करण्याचे बंधन परिस्थितीमुळे आणले आहे. कारण सुस्थिर मुलांनाच मुली देण्याकडे मुलींच्या कुटुंबीयांचा आग्रह आहे. बँक खाते, त्याशिवाय बँकेकडून मिळणा-या कर्जातदेखील अडथळा निर्माण होतो.
व्हिएतनामी उपवधू
चीनमधील पुरुषांनी परदेशातून मुलींना आणण्याचे प्रयत्न सुरू केले आहेत. त्यातही व्हिएतनामी मुलींना अधिक प्राधान्य दिले जात आहे.
काय आहेत कारणे ? : चीनमधील स्त्री-पुरुष गुणोत्तर प्रमाणातील असंतुलनामागे अनेक कारणे आहेत. देशात मुलगा-मुलगी पाहून गर्भपात करण्याचे प्रमाण अधिक आहे. सामाजिकदृष्ट्या मुलींना मुलांपेक्षा दुय्यम लेखले जाते. मुले वंश पुढे नेतात, हीच आशियातील धारणा चीनमध्ये आढळून येते.