बीजिंग - चीनच्या फुजेन प्रांताच्या शिंआंग्शीमध्ये एका मच्छीमारांने आपल्या ट्रकवर विशाल व्हेल मासा नेला. व्हेल माशाला छोट्या ट्रकमधून नेतांचा फोटो इंटरनेटवर व्हायरल झाला आहे. तो चीनी सोशल नेटवर्किंग साइट वीबोवर अनेकदा शेअर करण्यात आला आहे. याबाबत मच्छीमाराची टर उडवण्यात येत आहे.
त्या मच्छीमाराचे नाव काय शेंग्शू असे आहे. 17 फुट लांब आणि दोन टन वजन असलेली व्हेलची छायाचित्रे समोर आल्याने शेंग्शू विवादात अडकले आहेत. मुळात व्हेलला चीनमध्ये सुरक्षित जीव म्हणून घोषित करण्यात आले आहे. त्याचे शिकार, विक्री आणि खरेदी करणे बेकायदेशीर आहे. या कायद्यांबाबत शेंग्शूला माहिती नव्हती. हा विशाल व्हेल माझ्या मासे पकडण्याच्या जाळ्यात आपले खाद्य शोधताना अडकला. यात त्याचा मृत्यू झाला. आम्ही वाचवण्याचा प्रयत्न करण्यापूर्वीच अशी घटना घडली.
पुढील स्लाइड्सवर पाहा इंटरनेटवर शेअर करण्यात आलेले व्हेलचे छायाचित्रे...