आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Chinese Girl Was Selling Her Husband To Treat Women

पतीच्या उपचारासाठी चीनी महिलेने आपल्या मुलीला काढले होते विक्रीस

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बीजींग- चीनच्या फुझोऊ शहरात एका महिलेने पतीच्या उपचारासाठी आपल्या दोन निरागस मुलांना विकण्याचा प्रयत्न केला. इमारतीवरून खाली पडल्याने तिचा पती जखमी झाला होता.
चीनच्या न्यू वेबसाइटवर अपलोड केलेल्या छायाचित्रांनुसार, कियोंग नावाच्या महिलेने हातात पोस्टर पकडून आपल्या आपल्या पतीच्या उपचाराची भिक मागितली. त्या पोस्टरवर लिहिलेले आहे, 'आपल्या मुलीला विकायचे आहे. कामादरम्यान माझा पती जखमी झाला होता आणि आमच्याकडे त्यांच्या उपचारासाठी पैसे नाहीत. पतीला वाचवण्यासाठी मी आपली मुलगी विकत आहेत.'
कियोंगने स्थानिक पत्रकाराला सांगितले, की त्यांच्याकडे इतर कोणताच मार्ग नव्हता. कियोंगचा पती झोऊ, मागील गुरुवारी (11 डिसेंबर) कामाच्या वेळी इमारतीच्या तिस-या मजल्यावरून खाली पडला होता. त्याच्या मालकाने त्यांना 115 डॉलर मदत म्हणून दिले. परंतु त्यानंतर त्यांना कोणतीही मदत केली नाही.
कियोंगच्या मोठ्या मुलीने एक स्थानिक पत्रकाराला सांगितले, की अपघातापूर्वी झोऊला आपल्या मुलीला विकायचे होते. परंतु कियोंग याचा विरोध करत होती. मात्र, आता परिस्थिती अशी आली आहे, की कियोंगच आपल्या मुलीला विकायला निघाली आहे. चीनी न्यूज वेबसाइटवर झोऊच्या बँक अकाऊंट नंबर देण्यात आला आहे. जेणेकरून तिची मदत केली जाऊ शकेल.
पुढील स्लाइड्सवर क्लिर करून पाहा या कुटुंबाची छायाचित्रे...