आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Chinese Girls Cannot Carry Condom And Police Harasses Sex Workers

चीनमध्ये तरुणींना कंडोमची मनाई; सेक्स वर्कर्सला दिली जाते थर्ड डिग्री!

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बीजिंग- चीनमधील सेक्स वर्कर्स अडचणीत सापडल्या आहे. जनतेचे रक्षक समजले जाणारे पोलिसच त्यांच्या जीवावर उठले आहे. पोलिस त्यांना थर्ड डिग्री टॉर्चर करत आहेत. त्यांना झाडांना उलटे टांगून थंडगार पाण्याने भिजवले जाते. एवढेच नाही तर सेक्स वर्कर्सला बेकायदा अटक करून त्यांच्याकडून 'हप्ता वसूल'ही केला जात आहे. 'ह्यूमन राइट वॉच'च्या एका अहवालानुसार सेक्स वर्कर्सना एचआयव्ही टेस्ट करण्याच्या नावाखाली पोलिस घेऊन जातात आणि त्यांना तुरुंगात डांबून ठेवतात. तसेच चीनमध्ये कंडोम वापरावर तरुणींना बंदी घालण्यात आली आहे.

चीनमध्ये वेश्या व्यवसाय बेकायदा समजला जातो. विशेष म्हणजे त्याच्यावर प्रतिबंध घालण्यासाठी सरकारचे प्रयत्न सुरु आहेत. असे असले तरी चीनमध्ये 40 ते 60 लाख सेक्स वर्कर्स असल्याचा अंदाज आहे. चीनमध्ये अनेक सलून, मसाज पार्लरमध्ये सेक्स सर्व्हिस दिली जाते. अहवालानुसार सरकार आणि पोलिसांकडून करण्यात येत असलेल्या कारवाईत सेक्स वर्कर्सचे मोठे शोषण होताना दिसत आहे. पोलिस सेक्स वर्कर्स तसेच त्यांच्या ग्राहकांना अटक करून गुन्हा कबूल करण्यासाठी त्यांच्यावर दबाबतंत्राचा वापर करतात, असे 140 सेक्स वर्कर्स आणि त्यांचे ग्राहकांसोबत चर्चा केल्यानंतर स्पष्ट झाले आहे.