आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Chinese Government Bend Before The Citizen, Neclear Project Cancelled

जनतेच्या दबावापुढे चीनी सरकार झुकले, अणुप्रकल्प रद्द

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बीजिंग - जनतेचा दबाव आणि उग्र आंदोलनामुळे चीन सरकारने आपला महत्त्वाकांक्षी आण्विक प्रकल्प गुंडाळला. सुरक्षेच्या कारणावरून नागरिकांमध्ये सरकारविरुद्ध रोष निर्माण झाला होता. त्यामुळे सुमारे 35 हजार 934 कोटी रुपयांच्या या प्रकल्पाचे बांधकाम रद्द करण्याचे सरकारकडून शनिवारी जाहीर करण्यात आले.


गाँगडाँग प्रांतात या प्रकल्पाचे बांधकाम करण्यात येणार होते. त्यासाठी सर्व तयारी पूर्ण झाली होती. नॅशनल न्यूक्लियर कॉर्पोरेशनच्या अंतर्गत लाँगवन पार्कमध्ये तो होणार होता, परंतु झिशान शहर भागातील नागरिकांनी त्याला कडाडून विरोध केला. प्रकल्प रद्द करण्यासाठी जनता रस्त्यावर उतरली होती. परंतु सरकारने अखेर दबावापुढे माघार घेतल्याने नागरिकांचा जीव भांड्यात पडला आहे. प्रकल्प रद्द करण्यात आल्याचे जिआंगमेनच्या पालिका प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले.