आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

चीनच्‍या विज्ञान अकादमीने विकसित केला 100 मेगापिक्‍सेलचा कॅमेरा

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बीजिंग- चीनच्‍या एका संस्‍थेने 100 मेगापिक्सेल कॅमेरा विकसित केल्‍याचा दावा केला आहे. या कॅमे-याद्वारे 'हाय रिझॉल्‍यूशन' छायाचित्रे काढता येतील. आपत्ती व्‍यवस्‍थापन, वाहतूक व्‍यवस्‍था तसेच हवाई निरिक्षणामध्‍ये हा कॅमेरा अतिशय उपयुक्त ठरु शकेल, असे या संस्‍थेने म्‍हटले आहे.

चायनीज विज्ञान अकादमीने 'IOE3-Kanban' हा कॅमेरा विकसित केला आहे. हा कॅमेरा चीनचा सर्वाधिक मेगापिक्‍सेलचा आहे. यामधून 10240 * 10240 पिक्‍सेलचे छायाचित्र काढता येऊ शकेल, असे या संस्‍थेने म्‍हटले आहे. कॅमेरा अतिशय लहान आणि हलका आहे. कॅमे-याची रुंदी 19.3 सेंटीमीटर आहे. विशेष म्‍हणजे, उणे 20 पासून 55 अंश सेल्सिअस तापमानात कॅमेरा वापरता येऊ शकतो.

कॅमेरा अतिशय संवेदनशील आहे. तसेच त्‍याची रेंजही खूप जास्‍त आहे. त्‍यामुळे हवाई निरिक्षण, सिटी प्‍लॅनिंग, आपातकालीन व्‍यवस्‍थापन, वाहतूक व्‍यवस्‍था इत्‍यादी कामांमध्‍ये कॅमेरा अतिशय उपयुक्त ठरेल. चीनच्‍या हवाई सुदूर संवेदन यंत्रणेसाठी घेण्‍यात आलेल्‍या चाचणीत कॅमेरा यशस्‍वी ठरला आहे.