आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

चिनी पत्रकारांना मार्क्‍सवादाचे प्रशिक्षण मिळणार

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बीजिंग - सरकारी प्रसारमाध्यमाशी संबंधित तीन लाख पत्रकारांना मार्क्‍सवादाचे धडे घेण्याचे आदेश सरकारने दिले आहेत. इंटरनेटच्या वाढत्या प्रभावात मार्क्‍सवादाची पकड ढिली होऊ नये, यासाठी सरकारने हे उपाय योजले असल्याचे मानले जाते.

जून ते पुढील वर्षी जानेवारीपर्यंत तीन लाख पत्रकारांना मार्क्‍सवादाचे धडे दिले जातील, असे ग्लोबल टाइम्सच्या वृत्तात म्हटले आहे. चीनमधील आधुनिक प्रसारमाध्यमांमध्ये गुंतागुंत निर्माण झाली आहे. त्यामुळे पत्रकारांनी आणखी जबाबदारी घेणे आवश्यक असल्याचे अधिकार्‍याच्या हवाल्याने शिन्हुआच्या वृत्तात म्हटले आहे. इंटरनेट हा सार्वजनिक मतांसाठी युद्धाचा आखाडा तयार झाला आहे. मत मांडताना अनेकदा कायद्याचे उल्लंघन केले जाते, असे अधिकार्‍याने सांगितले. प्रशासनातील त्रुटी उघड करणार्‍या काही पत्रकारांना अटक करण्यात आली आहे. त्यांनी मायक्रोब्लॉग वेबसाइटमधून प्रशासनाविरुद्ध अफवा पसरवल्याचे सरकारचे म्हणणे आहे. प्रशिक्षण कार्यक्रमातून आधुनिक प्रसारमाध्यमात कार्यरत पत्रकारांना कितपत उपयोग होईल याबाबत साशंकता आहे.

वैचारिक मूल्याला महत्त्व
इंटरनेटमुळे चीनचे चित्र बदलले आहे. देशातील 30 कोटी लोक मायक्रोब्लॉगिंगशी जोडले गेले आहेत. जगात चीनमधील युर्जसची ही संख्या सर्वाधिक आहे. प्रसारमाध्यमांमध्ये तरुणांची संख्या वाढली असून त्यांची विचारसरणी बदलली आहे. चायना सेंट्रल टेलिव्हिजनमध्ये (सीसीटीव्ही) कार्यरत पत्रकार ली फेई या प्रशिक्षणात सहभागी झाले होते. प्रशिक्षणात व्यावसायिक मूल्यांपेक्षा वैचारिक मूल्यांनाचा महत्त्व दिल्याचे ते म्हणाले.