आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

चीनी नेता बो शिलाई म्हणतो, मी सामान्य माणूस; 50 वर्षे जुनी अंडरवियर वापरतो

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बीजिंग - चीनच्या सत्ताधारी पक्षातील बडी आसामी मानल्या जाणारे नेते बो शिलई यांच्यावरील भ्रष्टाचाराच्या खटल्यास सोमवारी सुरुवात झाली. सुनावणीमध्ये शिलई यांनी आपली बाजू मांडताना भलताच युक्तिवाद केला. मी एक सामान्य माणूस आहे. माझ्या अंगावर अजूनही पन्नास वर्षे जुने अंतर्वस्त्र असल्याचे त्यांनी न्यायालयात सांगितले.


देशातील हाय प्रोफाइल खटल्याकडे सा-यांचे लक्ष लागलेले असतानाच शिलई यांनी केलेल्या युक्तिवादाने उपस्थित सारेच अवाक् झाले. एवढ्या मोठ्या पदावर राहिलेले आणि सर्व प्रकारचे उंची जीवन जगणा-या शिलई यांनी आपल्या साधेपणाचा पुरावा देताना अंगातील अंडरवेअरचा हवाला दिला. ते एवढ्यावरच थांबले नाहीत, तर ही अंडरवेअर आपल्या आईने आपल्याला कशी दिली याचे वर्णनही त्यांनी कोर्टात सांगितले. खरे तर मला कपड्यांमध्येदेखील फार रुची नाही. 1960 मध्ये अंतर्वस्त्र खरेदी केले होते, असे 64 वर्षीय शिलई यांनी सांगितले.


काय आहे प्रकरण ?
ब्रिटिश उद्योजक नील हेवूड यांच्या हत्ये प्रकरणात शिलई यांची पत्नी गू यांच्यावर ठपका आहे. त्यांचा बचाव करण्यासाठी शिलई यांनी आपल्या अधिकाराचा गैरवापर केल्याचा आरोप झाल्यानंतर त्यांना नोव्हेंबर 2011 मध्ये सत्तेवरून पायउतार व्हावे लागले. वास्तविक देशाची सत्ता चालवणा-या पक्षाचे नेतृत्व करण्याची संधी त्यांच्याकडे आली होती, परंतु त्यांना खटल्यामुळे ती गमवावी लागली.