आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Chinese Man Offers To Rent Girlfriend For News Iphone 6

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

गर्लफ्रेंड भाड्याने देणे आहे! \'iPhone 6\'साठी चीनी तरुणाची शक्कल

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(फोटो: गर्लफ्रेंड भाड्याने देण्याचे होर्डिंग घेऊन चीनी तरुण वी छू)

बीजिंग- iphone ची क्रेज दिवसेंदिवस वाढत चालली आहे. Apple चा लेटेस्ट फोन 'iphone 6' खरीदी करण्यासाठी एकर चीनी तरुणाने चक्क गर्लफ्रेंडला भाड्याने देण्याचा निर्णय घेतला आहे. गर्लफ्रेंड भाड्याने देवून मिळालेल्या रुपयांतून iphone 6 खरेदी करणार आहे. व्हि छू असे या तरुणाचे नाव असून एक पाउंड (99 रुपये) प्रति तास दराने गर्लफ्रेंड भाड्याने देण्याची ऑफर दिली आहे.

शंघाई येथील शोंगजियांग युनिव्हर्सिटीत शिकणारा 25 वर्षीय व्हि छू याने गर्लफ्रेंड भाड्याने देण्यासाठी एक होर्डिंग तयार केले आहे. सध्या 'इंटरनेट'वर हे होर्डिंग व्हायरल झाले आहे. बातमीसोबत दिलेल्या छायाचित्रात व्ही छू होर्डिंग घेऊन उभा आहे. त्यावर गर्लफ्रेंड भाड्याने देण्याबाबत संदेश लिहिला आहे.
इंटरनेटवर गर्लफ्रेंड जियाओ ई (वय 21) हिचे छायाचित्र पाहू शकतात, असे व्ही छूने लोकांना आवाहन केले आहे. जियाओसोबत डेटिंगदरम्यान डिनरला जाता येईल. मात्र, तिच्यासोबत गैरवर्तन करण्याची परवानगी नाही, असेही छूने स्पष्‍ट केले आहे. या ऑफरला जियाओ हिने होकार दिला आहे.
दरम्यान, असाच प्रकार सौदी अरबमध्ये यापूर्वी घडला होता. एका व्यक्तीने 'iphone 6'च्या बदल्यात बहिणीसोबत विवाह करण्याने ऑफर दिली होती.

पुढील स्लाइड्‍सवर क्लिक करून पाहा, व्ही छू आणि त्याची गर्लफ्रेंड जियाओ ई हिचे फोटो...