आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Chinese Man Spends 4 Million Rupees Buying Iphone 6s To Propose A Girl

प्रपोज करण्‍यासाठी त्याने खरेदी केले 48 लाखांचे 99 iPhone 6 एस, पण तिचा अखेर नाकारच

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बीजिंग - चीनमध्‍ये मंगळवारी(ता.11)'सिंगल्स डे' साजरा करण्‍यात आला. या दिवशी हजारो लोकांनी खरेदी करुन आपण एकटे(Single) असल्याचा आनंद साजरा केला. पण एका चीनी तरुणांने आपल्या गर्लफ्रेंडला मागणीसाठी 48 लाख खर्च करुन 99 आय-फोन 6 एस खरेदी केले. प्रपोज पूर्वी त्याने आय-फोन्स जमीनवर बदामाच्या आकारात ठेवले.एवढे करुनही गर्लफ्रेंडने त्या प्रेम वेड्याचे प्रपोजल नाकारले.

प्रपोज करणारा तरुण चीनमधील गुआंगझाऊ प्रांतात व्यवसायाने प्रोग्रॅमर आहे. त्याने गर्लफ्रेंडला प्रपोज करण्‍यासाठी केलेला खर्च हा एखाद्या चीनी कर्मचा-याची 17 वर्षाच्या पगारापेक्षा अधिक आहे. या घटनेची छायाचित्रे चीनच्या वीबो या सोशल नेटवर्किंग साइटवर व्हायरल झाली आहेत.

पुढे पाहा त्या तरुणाचे आणि त्याच्या गर्लफ्रेंडची छायाचित्रे...