बीजिंग - चीनमध्ये मंगळवारी 'सिंगल्स डे' साजरा झाला. या दिवशी चीनमधील तरुण हजारो रुपयांच्या महागड्या भेटवस्तू खरेदी करुन सिंगल असल्याचा आनंद साजरा करतात. मात्र, एका चीनी व्यक्तीने गर्लफ्रेंडला प्रपोज करण्याचे मनोमन ठरवले होते. त्यासाठी त्याने 48 लाख रुपये खर्च करुन गर्लफ्रेंडसाठी 99 आयफोन 6S खरेदी केले. प्रपोज करण्याआधी त्याने सर्व आयफोन 'दिल'च्या आकारात सजवून ठेवले होते. त्यासोबतच पुष्पगुच्छही तयार ठेवला होता. मात्र, एवढे करुनही गर्लफ्रेंडने त्याच्या प्रेमाचा स्विकार केला नाही आणि त्याला लग्नासाठी नकार दिला.
आपले सिंगल स्टेटस बदलण्याची इच्छा असलेला गुआंगझाऊ हा व्यवसायाने प्रोग्रामर आहे. त्याने गर्लफ्रेंडला प्रपोज करण्यासाठी जेवढी रक्कम खर्च केली, तेवढा पगार एखादा सर्वसाधारण चीनी व्यक्ती 17 वर्षांच्या मेहनतीनंतर कमावतो. त्याच्या प्रपोज करण्याची छायाचित्रे आता चीनची सोशल नेटवर्किंग साइट वीबोवर व्हायरल झाली आहेत.
पुढील स्लाइडमध्ये पाहा, आणखी छायाचित्र