चिनी मून महोत्सव पारंपरिकरित्या सप्टेंबर किंवा ऑक्टोबरच्या पंधराव्या दिवशी साजरा केला जातो. या महोत्सवास मिड ऑटोमन महोत्सव या नावानेही ओळखले जाते. यंदा हा महोत्सव 8 सप्टेंबरपर्यंत चालणार आहे. चिनी लोक यानिमित्त तीन दिवस सुटी घेतात.
मिड ऑटमन महोत्सव हा स्प्रिंग महोत्सवानंतर चीनमधील दुस-याक्रमांकाचा सर्वात मोठा महोत्सव आहे.प्रत्येक वर्षी जेव्हा महोत्सव येतो त्यावेळी कामानिमित्त देशाच्या वेगवेगळ्या भागात आणि विदेशात गेलेली लोक
आपापल्या घरी परतात. आपल्या कुटूंबाबरोबर ते जेवतात, पूर्ण चंद्राचे कौतुक करतात आणि मूनकेक खातात.
पूर्ण चंद्र हा शांतता, समृध्दी आणि एकत्र कुटूंबपध्दतीचे प्रतिक चिनी लोक मानतात. मिड-ऑटमन महोत्सवाच्या प्रसंगी चंद्र हा प्रकाशित आणि पूर्ण असतो. त्यामुळे महोत्सवाला मून महोत्सव असे म्हणतात. हा महोत्सव चीनच्या शेजारील देशांमध्येही साजरा केला जातो.
पुढे पाहा महोत्सवाचे छायाचित्रे...