आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Chinese Newborn Survives Being Flushed Down The Toilet By His Mother

\'माता न तू वैरीणी\' नवजात अर्भकाला टॉयलेटमध्‍ये केले फ्लश, पाहा PICS

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवजात अर्भकाला टॉयलेटमध्‍ये टाकून फ्लश करणा-याचा प्रकार उत्तरपूर्व चीनमधील शांक्‍सी प्रांतात घडला आहे. अर्भकाला टॉयलेटमध्‍ये टाकून त्‍याची माता पसार झाली. मात्र एका पादचा-याला लाहन मुल रडत असल्‍याचा आवाज आल्‍यांनतर हा प्रकार उघडकीस आला. नशिब बलवत्तर असल्‍यामुळे त्‍या चिमुकल्‍याचे प्राण वाचले आहेत. पोलिस त्‍या क्रुर मातेचा शोध घेत आहेत.
पादचा-याला हा प्रकार लक्षात आल्‍यांनतर त्‍याने तात्‍काळ पोलिसांना या घटनेची माहिती दिली. यांनतर फायर विभागाचे कर्मचारी घटनास्‍थळी पो‍हचले. फायर विभागाच्‍या कर्मचा-यांनी अर्भकाला बाहेर काढून त्‍याचे प्राण वाचवले. या बाळाला सध्‍या एका स्‍थानिक रूग्‍णालयात दाखल केले आहे. या बालकाचे नाव Xiaoxiao ठवेण्‍यात आले आहे. या नावाचा इंग्रजीमध्‍ये 'teeny tiny' असा अर्थ होतो. या अर्भकाला वाचवण्‍यासाठी परिश्रम घेणारे फायर विभागाचे कर्मचारी म्‍हणाले की आमच्‍याकडे वेळ खूप कमी होता. अर्भक टॉयलेटमध्‍ये असताना एखाद्याने फ्लश केले असते तर अर्भकाचा मृत्‍यू झाला असता. मात्र ताबडतोप माहिती मिळाल्‍यामुळे आम्‍ही त्‍याचे प्राण वाचवू शकलोत.
पुढील स्‍लाईडवर पाहा अर्भकाची छायाचित्रे...