आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Chinese Police Beat Stray Dog To Death In Front Of Its Owner

चीनी पोलिसांचे भयंकर रूप, मालकाच्या डोळ्यांदेखत कुत्र्याचा घेतला जीव

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पोलिसांची काम करण्याची पद्धत आणि लोकांविषयीचा राग याची नेहमीच चर्चा होत असते. ही काही एका देशातील स्थिती नाही तर अनेक देशांमध्ये पोलिसांचे हे रूप पाहायला मिळाले आहे. नुकतेच पोलिसांचे हे भयंकर रूप चीनमध्ये पाहायला मिळाले, जेव्हा पोलिसांनी एका बेघर व्यक्तीला आणि त्याच्या कुत्र्याला अमानुष, वागणूक दिली.
ज्यांनी हे अमानुष कृत्य डोळ्यांदेखत पाहिले ते लोक सांगतात, की रस्ताच्या कडेला एक व्यक्ती त्याच्या कुत्र्याची साखळी हातात घेऊन बसला होता आणि दोन पोलिस त्यांच्या स्टीलच्या काठीने आणि फावड्याने कुत्र्याला मारत होते. प्रत्यक्षदर्शीनी सांगितले, की पोलिसांनी आधी त्या व्यक्तीला काही प्रश्न विचारले मात्र त्याने उत्तर दिले नाही. उत्तर न मिळाल्याने पोलिसांनी गाडीतून एक स्टीलची काठी काढली आणि कुत्र्यास अमानुष पद्धतीने मारण्यास सुरवात केली.
पोलिसांनी मालकाच्या डोळ्यांदेखतच कुत्र्याला बेदम मारले. त्याचा मालक असहाय्यपणे बसलेला होता. तो त्याच्या कुत्र्याला मारलेले पाहू शकत नव्हता मात्र तो पोलिसांनाही विरोध करू शकत नव्हता. कुत्र्याला खूप वेळ मारल्यानंतर, 10 मिनिटांनी हालचाल करत नाही हे लक्षात आल्यानंतर पोलिसांनी मारणे बंद केल्याचे प्रत्यक्षदर्शीनी सांगितले.
पोलिसांचा हा कारनामा पाहण्यासाठी लोकांनी गर्दी केली होती. पोलिसांची ही वागणुक पाहून लोक नाराज झाले आहेत.
चीनी पोलिसांनी कशा अमानूषप्रकारे कुत्र्याचा जीव घेतला पाहा पुढील फोटोंमध्ये...