आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्रलंबित मुद्दे सोडवण्याचा भारत-चीनकडून निर्धार

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बीजिंग - भारताच्या परराष्ट्र धोरणात चीनला प्राधान्य असल्याचे सांगत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी चीनचे पंतप्रधान ली केकिंग यांना प्रलंबित मुद्द्यांवर चर्चा करण्याचे आश्वासन दिले आहे. पंतप्रधान ली यांनी गुरुवारी मोदी यांना दूरध्वनी करून अभिनंदन केले. या वेळी त्यांनी नव्या सरकारबरोबर द्विपक्षीय संबंध सुधारण्याची इच्छा व्यक्त केली.

मोदी यांनी चीनसोबत कोणत्याही प्रलंबित मुद्द्यावर द्विपक्षीय संबंध निर्माण करून विकासाचे लक्ष्य गाठण्याची बांधिलकी व्यक्त केली. त्यांनी दोन्ही देशांतील आर्थिक सहकार्य संबंधाबाबत समाधान व्यक्त केले. दोन्ही देशांनी उच्चस्तरीय पातळीवर संवाद सुरू ठेवण्यास सहमती दर्शविली. मोदी यांनी ली यांच्यामार्फत चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांना या वर्षअखेर भारत भेटीचे निमंत्रण दिले. भारताच्या परराष्ट्र धोरणात चीनला प्रथम प्राधान्य असल्याचे मोदी यांनी अधोरेखित केले.

चीन सरकारने विदेशमंत्री वांग यी यांना 8 जून रोजी परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांची भेट घेण्यासाठी भारत दौर्‍यावर पाठविण्याचा निर्णय घेतला आहे. यानंतर ली यांनी मोदींना दूरध्वनी केला. त्याआधी लोकसभा निकालानंतर चीन सरकारने मोदींचे अभिनंदन केले होते.
चीन सरकारने भारताचे बीजिंगमधील राजदूत अशोक के कांथा यांना विशेष संदेश पाठवून मोदींचे अभिनंदन केले. भारत आणि चीन एकमेकांचे महत्त्वाचे शेजारी असून जगातील उभारत्या बाजारपेठा आहेत.
भारत नैसर्गिक मित्र
ली यांनी मोदी यांना केलेल्या दूरध्वनीमध्ये भारत चीनचा नैसर्गिक मित्र असल्याचे सांगितले. भारत सरकारसोबतच्या धोरणात्मक सहकार्यातून उभय देशांतील सहकार्य संबंधांची नवी पातळी गाठली जाईल, अशी आशा त्यांनी व्यक्त केली.

ब्रिक्समध्ये भेटण्याची संधी
ब्राझील, रशिया, भारत, चीन आणि दक्षिण आफ्रिका देशांच्या पुढील महिन्यात होणार्‍या ब्रिक्स परिषदेमध्ये चीनचे राष्ट्राध्यक्ष शी पिंकझीन आणि मोदी यांची भेट होणे अपेक्षित आहे.
पंचशीलमध्ये सहभागी व्हा!
माजी पंतप्रधान दिवंगत पंडित नेहरू आणि चीनचे तत्कालीन पंतप्रधान झोऊ इनलाई यांनी 1954 मध्ये पंचशील धोरणाची आखणी केली होती. पंचशील धोरणाच्या साठाव्या वर्धापनदिनाच्या कार्यक्रमात भारतीय नेत्याने सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात आले आहे.