आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Chinese President Xi Jinping To Break Protocol, Will Meet Sushma Swaraj

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

ड्रॅगनचाही मैत्रीचा हात, प्रोटोकॉल दूर सारून जिनपिंग सुषमांशी चर्चा करणार

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(फोटो : चिनी परराष्ट्रमंत्र्यांसोबत सुषमा स्वराज)
बीजिंग - बराक ओबामा यांच्या भारतभेटीमुळे अस्वस्थ होऊन चीन आक्रमक धोरण अवलंबेल या तज्ज्ञांच्या अंदाजाला चकवा देत रविवारी चीनने अनपेक्षितपणे मैत्रीचा हात पुढे केला. चीनचे राष्ट्रपती शी जिनपिंग प्रोटोकॉल बाजूला ठेवून परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांची सोमवारी भेट घेत आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी मे महिन्यात चीनला जाणार असून भारत-चीन संबंध सक्षम करण्यासाठी प्राथमिक आराखडाही तयार झाला आहे. चीनची ही बदलती सहकार्याची भूमिका हा भारताच्या परराष्ट्रनीतीचा विजय मानला जात असून अमेरिका या जगातील पहिल्या क्रमांकाच्या अर्थव्यवस्थेपाठोपाठ चीन ही जगातील दुसर्‍या क्रमांकाची अर्थव्यवस्था भारताच्या पाठीशी उभी राहिली तर भारतीयांचे “अच्छे दिन’ दूर राहणार नाहीत.

कैलास-मानसरोवर मुद्दा महत्त्वाचा
सोमवारी स्वराज राष्ट्रपती शी जिनपिंग यांच्याशी चर्चा करतील तेव्हा कैलास मानसरोवर यात्रेचा मुद्दा महत्त्वाचा ठरेल. कैलास ते मानसरोवर हा प्रवास थेट बसने सुलभरीत्या करता यावा म्हणून भारत सरकारचा प्रयत्न असून चीननेही या प्रस्तावाला मान्यता दिली आहे.

एका इंग्रजी दैनिकाने दिलेल्या वृत्तानुसार भाजपने ज्या मुद्दयांवर तयारी दर्शवली आहे ते असे -
- हुरियतशी बोलणी करण्यास तयारी दर्शवणे.
- लष्करी कायदा टप्प्याटप्प्यात मागे घेणे.
- ३७० कलम रद्द करण्याचा आग्रह सध्या मागे घेणे.
- काश्मीरला विशेष आर्थिक पकेज देण्यासाठी पक्षाची मान्यता.
- याशिवाय पाकव्याप्त काश्मीरसंबंधात पाकिस्तानशी बोलणी सुरू करण्याचीही भाजपची तयारी.
- दिल्ली निवडणुकीनंतर पंतप्रधान मोदी यावर शिक्कामोर्तब करतील.
पुढे वाचा,पाकची कोंडी करण्याची नीती....