आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Chinese School News In Marathi, Eyes, Students, Education,

विद्यार्थ्यांचे डोळे खराब होऊ नयेत यासाठी चीनमधील शाळेत लढवली अभिनव कल्पना

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
वुहान (चीन)- हुबेई प्रांतातील शाळांमध्ये विद्यार्थ्यांचे डोळे खराब होऊ नयेत यासाठी अभिनव कल्पना लढविण्यात आली आहे. येथील शाळांमध्ये प्रत्येक विद्यार्थ्याच्या बेंचवर मेटल बार लावण्यात आला आहे. वाचन करताना विद्यार्थ्यांनी बार आणि बेंचमध्ये निर्धारित करण्यात आलेले अंतर ठेवावे असे सांगण्यात आले आहे. यामुळे विद्यार्थ्यांचे डोळे खराब होणार नाही, असे चीनी प्रशासनाने सांगितले आहे.
यासंदर्भात झेंग लिन एलिमेंट्री शाळेचे मुख्याध्यापक झेंग जियानमिंग म्हणाले, की टीन अॅंटी मायोपिया विभागाने विद्यार्थ्यांच्या बेंचवर मेटल बार लावले आहेत. विद्यार्थ्यांचे डोळे खराब होऊ नयेत आणि त्यांना वाचताना सुरक्षित अंतर ठेवण्याची सवय लावावी, यासाठी हे मेटल बार लावण्यात आले आहेत.
गरजेप्रमाणे मेटर बार मागे-पुढे करण्याची सोय आहे. त्यामुळे विद्यार्थी वाचत नसतील तेव्हा बार पुढे सरकवून ठेवता येतात.
हुबेई प्रांतातील शाळांमध्ये लावण्यात आलेल्या मेटर बारची छायाचित्रे बघा पुढील स्लाईडवर