आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Chinese Submarine To Reach 7000 Meters Deep In Pacific Ocean

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

चिनी पाणबुडीची मोहीम सुरू

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बीजिंग। जगातील सर्वात खोलीच्या समुद्र प्रवासाला चीनची पाणबुडी रविवारी रवाना झाली आहे. जियाओलोंग नावाची ही पाणबुडी प्रशांत महासागरात 7000 मीटर खोलीपर्यंतच्या तळाचा वेध घेणार आहे. सागरार्पणासाठी पूर्वेकडील जियायिंग या बंदरातून एक भले मोठे जहाज ही पाणबुडी घेऊन निघाले आहे. जूनच्या मध्यास किंवा जुलैच्या पहिल्या आठवड्यापर्यंत ही पाणबुडी आपले निर्धारित लक्ष्य गाठण्याची शक्यता आहे.
या पाणबुडीसोबत मोहिमेवर तीन पाणबुडेही निघाले आहेत. त्यांची नावे यी कॉँग, फु वेंताओ आणि टॅँग जियालिंग अशी आहेत. त्यांच्यासोबत सुमारे 100 शास्त्रज्ञही पाठवण्यात आले आहेत. हे शास्त्रज्ञ या पाणबुडीच्या संचलनावर बारीक लक्ष्य ठेवण्याबरोबरच वैज्ञानिक संशोधनाचे कामही करणार आहेत. सोबत समुद्राच्या तळाचे काही नमुनेही गोळा करून घेऊन येणार आहेत.

पाणबुडीची वैशिष्ट्ये
ही पाणबुडी अशा 17 प्रयत्नात दक्षिण चिनी समुद्रात 3,759 मीटर खोलीपर्यंत जाऊन आली आहे.
मागील वर्षी ती 5,188 मीटर खोलीपर्यंत पोहोचली होती. त्यामुळे चीन जगातील 70 टक्के समुद्र तळाचे सर्वेक्षण करण्यास समर्थ ठरला होता.

काय आहे महत्त्व?
दक्षिण- पश्चिम हिंद महासागराच्या तळाशी पॉलिमेटॅलिक सल्फाइडच्या 15 वर्षे खणण कामाचे अधिकार मिळवण्याच्या दृष्टिकोनातून चीनने टाकलेले हे महत्त्वाचे पाऊल आहे. 7000 मीटर खोलीपर्यंत पोहोचण्याचा दुसरा अर्थ आहे सबंध जगाच्या समुद्र तळापर्यंत मजल मारणे.

चीन बनला पाचवा देश
3,500 मीटर खोल समुद्र तळापर्यंत मानवयुक्त पाणबुडी पाठवणारा चीन हा जगातील पाचवा देश बनला आहे. या पूर्वी अमेरिका, फ्रान्स, रशिया आणि जपानने या मोहिमा फत्ते केल्या आहेत.