आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Chinese Teen Cut Off His Own Hand To Cure Internet Addiction News In Marathi

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

\'इंटरनेट\' वापराची सवय सुटावी म्हणून युवकाने चक्क कापला स्वत:चा हात

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(प्रतिकात्मक छायाचित्र)

नानटोंग- 'इंटरनेट' वापराची सवय सुटावी म्हणून एका युवकाने स्वत:ला शिक्षा ‍दिली आहे. युवकाने त्याचा उजवा हाताचा पंजा कापला. चीनमधील जियांगसु प्रांतातील नानटोंग शहरात ही घटना घडली. वांग (वय-19) असे या युवकाचे नाव आहे.

जियांगसु टीव्हीने प्रसारित केलेल्या वृत्तानुसार, वांग याने चाकूने स्वत:चा उजवा हात कापला. एवढेच नाही तर आईला चिठ्ठा लिहिली. त्यात आपण स्वत:चा हात कापल्याचा लिहिले आणि टॅक्सी बोलवून रुग्णालयात दाखल झाला.

'आई मी थोड्या दिवसांसाठी रुग्णालयात जात आहे.', असे वांग याने त्याच्या आईसाठी लिहून ठेवलेल्या चिठ्ठीत म्हटले होते. वांग खूप हुशार आहे. तो असे पाऊल उचलेले असे स्वप्नातही वाटले नसल्याचे त्याच्या आईने म्हटले आहे.
वांगच्या हातावर डॉक्टरांनी तत्काळ सर्जरी केली. वांगचा हात पुन्हा जोडला. परंतु पूर्ववत होऊ शकेल की नाही. याबाबत डॉक्टरांनी कोणतीही गॅरंटी दिली नाही.
दरम्यान, एका अहवाला नुसार, आशियातील देशांपैकी एकट्या चीनमध्ये 6490 लाख इंटरनेट यूजर्स आहेत. त्यापैकी 240 लाख लोक 'वेब अॅडीक्ट' आहेत.