आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Chinese Tourist Take Alien Photo In Beijing, Gollum Like Monster

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

चीनमध्ये आढळला 'एलियन', पाहा पर्यटकाने कैद केलेली छायाचित्रे...

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(चीनी पर्यटकाने काढलेला एलियन सारख्या जीवाचा फोटो)

बीजिंग - चीमधील बीजिंगच्या उत्तरेकडे हुआएरू नावाचे छोटेसे गाव आहे. या ठिकाणच्या वन क्षेत्रात एका पर्यटकाने जंगलात विचित्र जीव पाहिला. हा जीव गतीशील होता आणि काहीसा मानवासारखा दिसत होता, असे या पर्यटकाचे म्हणणे आहे. पण त्याचे कान आणि हावभाव मात्र पूर्णपणे वेगळे असल्याचे त्याने सांगितले. हॉलीवूडपट ‘लॉर्ड ऑफ द रिंग’ च्या गोलम (एलियन) पात्राप्रमाणे हा जीव दिसत होता, असे पर्यटकांचे म्हणणे होते. या पर्यटकाने त्याच्या कॅमे-याने फोटो काढून ते इंटरनेटवर अपलोड केले आहेत. या पर्यटकाने त्याचे नाव मात्र उघड केलेले नाही.

या फोटोची विश्वासार्हता कशी ठरावायची, असा प्रश्नही इटंरनेटवर उपस्थित करण्यात आला आहे. तर एका युवकाने लिहिले की, त्याची टीम डोंगरांवर शुटिंग करत असताना हा फोटो काढण्यात आला. पण या पर्यटकाने या कमेंट खोडून काढल्या आहेत. मानव कोणत्याही वेशात असला तरी तो सहज ओळखता येतो, पण हा जीव तसा नव्हता असे या पर्यटकाचे म्हणणे आहे.
पुढील स्लाईड्सवर पाहा पर्यटकाने घेतलेले काही PHOTOS