आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Chinese TV Show Cleavages Scene Censors Furious Viewers Complain

चीनमध्ये महाराणीचे क्लीवेज दाखविणार्‍या प्रोग्रामवर सेन्सॉरची कात्री, दर्शकांमध्ये नाराजी

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बीजिंग - चीनमध्ये सध्या एका बीग बजेट टीव्ही शो वरुन सोशल मीडियामध्ये जोरदार चर्चा सुरु आहे. ऐतिहासिक पार्श्वभूमीवर तयार करण्यात आलेल्या 'द एम्प्रेस ऑफ चायना' या शोमध्ये महिलांना लो कट ड्रेस परिधान करण्यास आणि क्लीवेज दाखवण्यावर बंदी घालण्यात आली आहे. या सेन्सॉरशिपविरोधात चीनी दर्शकांमध्ये प्रचंड नाराजी आहे. गेल्या महिन्यात तांत्रिक कारणांचा हवाला देऊन हा शो ऑफ एअर करण्यात आला होता. मात्र पुन्हा एकदा त्याचे प्रसारण सुरु करण्यात आले आहे. यामुळे दर्शकांना आश्चर्याचा धक्का बसला. मात्र, नव्याने प्रसारित होणार्‍या शो मध्ये महिलांचे रिव्हिलिंग ड्रेसमधील दृश्य क्रॉप करुन दाखवण्यात आले आहे. चाहत्यांना त्यांच्या आवडत्या अभिनेत्रींचे तर कधी कधी फक्त चेहेरेच पाहावे लागत आहेत.
चीनची एकमेव महाराणी
या टीव्ही शोला 'द सागा ऑफ व्हू जेटियन' या नावाने देखील ओळखले जाते. हा चीनमधील सर्वात महागडा टीव्ही शो आहे. याची कथा चीनची एकमेव सम्राज्ञीच्या जीवनावर आधारीत आहे. तिचा शासन काळ हा इसवी सन पूर्व 690 ते इसवी सन पूर्व 705 असा मानला जातो. 21 डिसेंबर पासून हुनान टीव्ही या व्यवसायिक चॅनलवर हा शो प्रसारित केला गेला. मात्र, एका आठवड्यातच तांत्रिक बिघाड झाल्याचे कारण पुढे करुन बंद करण्यात आला. नवीन वर्षाच्या सुरुवातीला पुन्हा एकदा त्याचे प्रसारण सुरु करण्यात आले, यामुळे प्रेक्षकांना आश्चर्य वाटले. पण जेव्हा त्यांनी शो पाहिले तेव्हा त्यात महिलांचे दृश्य एडिट करण्यात आले होते. क्लीवेज दिसतील अशी दृश्य क्रॉप करुन दाखवण्यात आले. यामुळे या शोचे दर्शक नाराज झाले. त्यांनी कार्यक्रामचे सेंसर करण्याआधीचे आणि नंतरचे दृश्य सोशल वेबसाइट वीबोवर पोस्ट केले, आणि चीन सरकारकडे त्याची तक्रार केली आहे.
एडिटींग करुन इतिहासाची मोडतोड
या शोमधील महिलांवरील चित्रीत दृश्य क्रॉप केल्याने प्रेक्षक नरा्ज झाले आहेत. त्यांनी त्यांच्या संतपा सोशल वेबसाइटवर व्यक्त केला आहे. या शोसाठी 3000 ड्रेसेस तयार करण्यात आले. त्यासाठी जवळपास 1.5 मिलियन डॉलर अर्थात 9.5 कोटी रुपये खर्च करण्यात आले आहे. तर, महाराणीच्या भूमिकेतील अभिनेत्री शेकडो कॉस्ट्यूम बदलते. अशा वेळेस महिलांचे दृश्य एडित करुन फक्त त्यांचे चेहरेच दाखवणे ही दर्शकांची दिशाभूल आहे. काही प्रेक्षकांनी याला इतिहासाची मोडतोड म्हटले आहे. तर, काही प्रेक्षकांचा दावा आहे, की महाराणी वू जेडियन आणि त्या काळातील राजघराण्याच्या महिला या लोअर नेकलाइन ड्रेस परिधान करत होत्या. साइना वीबो या सोशल नेटवर्किंग साइटवर या मुद्यावरुन पोल घेण्यात आला. त्यात 86 हजार युजर्सनी सहभाग नोंदवला. त्यातील 95 टक्के लोकांनी एडिटींग चुकीचे असल्याचे म्हटले आहे. त्यासोबतच क्लीवेज दाखविणे म्हणजे काही पोर्नोग्राफी आहे का, असा सवालही केला आहे. एकाने लिहिले आहे, की आता काही साम्राज्यवाद नाही.
पुढील स्लाइडमध्ये पाहा, टीव्ही शो संबंधीत दृश्य जे नंतर एडिट केले गेले.

फोटो - 'द एम्प्रेस ऑफ चायना' कार्यक्रमात महाराणीच्या भूमिकेतील अभिनेत्री बिंग बिंग