आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

दोन अवाढव्य दगडांमध्ये अडकली चीनी महिला, थोडक्यात वाचला जीव

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुदानजियांग (चीन)- हेलॉन्गजियांग प्रांतात माऊंटन टुरिझमसाठी एक महिला गेली होती. यावेळी ती दोन अवाढव्य दगडांमध्ये फसली. येथून निघणे तिच्यासाठी जवळपास अशक्य होते. उपलब्ध उपकरणांच्या मदतीने तिने याची माहिती फायरफायटर्सना दिली. त्यानंतर तिची सुटका करण्यात आली.
या महिलेचे नाव समजू शकले नाही. पर्यटक महिला हेलॉन्गजियांग प्रांतात एकटी गेली होती. ट्रेकिंग करीत असताना ती दोन दगडांमध्ये फसली. यातून बाहेर निघण्याचा तिने कसोशिने प्रयत्न केला. परंतु, तिला यश आले नाही. तिची कंबर दोन दगडांमध्ये फसली होती.
तिने याची माहिती फायरफायटर्सना दिली. त्यानंतर 12 जवान घटनास्थळी आले. त्यांनी तिला काढण्याचा प्रयत्न केला. परंतु, तासभर प्रयत्न केल्यावरही महिला सुरक्षितपणे बाहेर येत नव्हती. अखेर दोरींच्या मदतीने तिला बाहेर काढण्यात आले.
या घटनेची छायाचित्रे बघा पुढील स्लाईडवर