आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Chinese Woman Held Hostage On Street By Cleaver Wielder

गळ्यावर चाकू ठेवून तासभर ब्लॅकमेलिंग

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

कुनमिंग - चीनमध्ये पोलिसांच्या सतर्कतेमुळे एका कठीण प्रसंगातून महिलेचे प्राण वाचले. एका माथेफिरू तरुणाने भररस्त्यात महिलेच्या गळ्यावर धारदार चाकू ठेवून तिचे शिर कापण्याची धमकी देत होता. महिलेला ओलीस ठेवून तो सतत धमकावत होता. मात्र, पोलिसांनी त्याला बोलण्यात गुंतवून ठेवून शेवटी महिलेची सुखरूप सुटका केली. चीनच्या युनान प्रांतात महिन्याभरात चाकूहल्ल्यात 40 जणांचा मृत्यू झाला आहे.

तासभर चालले थरारनाट्य
घटना कळताच पोलिस घटनास्थही दाखल झाले. त्यांनी चाकूधारी माथेफिरूची बराच काळ मनधरणी केली, परंतु तो बधत नव्हता. तो पैसे देण्यासह इतर मागण्यांवर ठाम होता. बोलण्यात गुंतवून पोलिस त्याच्याजवळ गेले व झडप घालून महिलेची सुटका केली.

तणावातही महिला शांत होती
महिलेला ओलीस ठेवणारा तरुण अतिशय संतापलेला होता. महिलेच्या गळ्यावर चाकू ठेवून तो आरडओरड करत होता, सतत धमक्या देत होता. हा प्रकार तासभर चालला. मात्र, अशा प्रसंगातही ती महिला कमालीची शांत होती. तिने सुटकेसाठी धडपड केली असती तर त्यात तिचा बळीही गेला असता. पोलिसांनी सुटका केल्यानंतर मात्र ती बेशुद्ध पडली. तिला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले.