आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराजगातील कोणत्याही देशात स्त्रीयांची अवस्था अजूनही दयनीय आहे, आजही त्यांना दासी समजले जाते, याचा वेळोवेळी प्रत्येय येतो. पुरुषसत्ताक समाजामध्ये स्त्रीयांनी कितीही प्रगती केली असली तरी, आजही मारहाण आणि अमानुष छळाला त्यांना सामोरे जावे लागते. दक्षिण आशियामध्ये महिलांना मारहाण करण्याच्या घटना या नित्याच्या झाल्या आहेत. ताजे प्रकरण हे चीन मधील आहे. इथे पती भररस्त्यात त्याच्या पत्नीला सर्वांसमक्ष मारहाण करत होता.
चीनच्या चांगचुन शहरामधील या घटनेत पतीने त्याच्या पत्नीचे केस पकडून ओढत तिला रस्त्यावर आणले. भरस्त्यावरच त्याने पत्नीला लाथा-बुक्यांनी बेदम मारहाण केली. ही महिला गेल्या तीन महिन्यांपासून घरी आली नव्हती, हा तिचा गुन्हा होता. त्याची अशी शिक्षा तिला दिली जात होती. यावेळी रस्त्यावर बघ्यांचीही मोठी गर्दी झाली. लोकांनी त्याला अडविण्याचा खूप प्रयत्न केला मात्र, तो कोणाचेही ऐकून घेत नव्हता. लोकांनी त्याला समजावून सांगण्याचा प्रयत्न केला. जर, तुला तिच्या सोबत राहायचे नसेल तर तिला सोडून दे. पत्नीला मारहाण करण्याचा तुला अधिकार नाही.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.