आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Chinese's Defence Expenditure Increases ; Three Fold Extra To India

चीनच्या संरक्षण खर्चात वाढ; भारतापेक्षा तिपटीने जास्त

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बीजिंग - चीनने आपल्या संरक्षण खर्चात 10.7 टक्क्यांची मोठी वाढ करून ते 115.7 अब्ज डॉलरवर (सुमारे 6,347 अब्ज रुपये) आणले आहे. 2012-13 मध्ये हा संरक्षण खर्च 106.4 अब्ज डॉलर होता. चीनचा हा संरक्षण खर्च भारताने नुकत्याच जाहीर केलेल्या 37.4 अब्ज अमेरिकी डॉलर (सुमारे 2,051 अब्ज रुपये )पेक्षा तीनपट अधिक आहे. शेजा-यांशी सुरू असलेल्या सीमावादाच्या पार्श्वभूमीवर आपल्या महत्त्वाकांक्षा अधोरेखित केल्या आहेत.

मावळते पंतप्रधान वेन जियाबाओ यांनी नॅशनल पीपल्स काँग्रेस (एनसीपी) या चिनी संसदेच्या वार्षिक अधिवेशनात केली. दशकातून एकदा होणारे सत्ता हस्तांतर याच अधिवेशनात होणार आहे. एनसीपीसमोर सादर करण्यात आलेल्या अर्थसंकल्पीय प्रस्तावानुसार 720.168 अब्ज युआनची तरतूद संरक्षणासाठी करण्यात आली आहे. चालू चलन दरानुसार ही रक्कम 115.7 अब्ज डॉलरवर जाते. चिनी संरक्षण दलांच्या अत्याधुनिकीकरणासाठी ही तरतूद करण्यात आली आहे. 2012 मध्ये चीनने संरक्षणावर 106.4 अब्ज डॉलर खर्च केला. त्याआधीच्या वर्षाच्या तुलनेत संरक्षण खर्चातील ही वाढ 11.5 टक्के होती. त्यामुळे चीन संरक्षणावर मोठी रक्कम खर्च करणारा जगातील आघाडीचा देश ठरला होता.

प्रत्यक्ष तरतूद अधिक
चीनने जाहीर केलेल्या संरक्षण खर्चापेक्षा प्रत्यक्ष खर्चाची रक्कम कितीतरी मोठी असल्याचे संरक्षण विश्लेषकांना वाटते. मात्र बीजिंगने जाहीर केलेली रक्कम वस्तुनिष्ठ असल्याचे म्हटले आहे. चीनचे शांततामय परराष्ट्र धोरण आणि संरक्षणात्मक लष्करी धोरणे आशियात शांतता, स्थैर्य आणि सुरक्षिततेच्या दृष्टीने महत्त्वाची भूमिका बजावली आहे, असे एनसीपीचे प्रवक्ते फू यिंग यांनी म्हटले आहे.

भारताची चिंता वाढली
चीनचे वाढते लष्करी आणि आर्थिक सामर्थ्यामुळे आशिया खंडातील भारत, जपान आणि दक्षिण कोरियासह अनेक देशांची चिंता वाढली आहे. दक्षिण कोरिया व जपानशी वादग्रस्त बेटावरून वाढत चाललेले मतभेद आणि दक्षिण चिनी समुद्रावरून नैर्ऋत्य आशियातील अनेक देशांशी उडत असलेल्या खटक्यांच्या पार्श्वभूमीवर चीन संरक्षण दलांचे झपाट्याने अत्याधुनिकीकरण करू लागला आहे. त्यामुळे या देशांची चिंतेत भर पडली आहे.