आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

श्री चिन्मय स्वामी यांचा लंडनमध्ये पुतळा

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

लंडन - भारतीय अध्यात्मातील शांतता,बंधुभावाचा संदेश जगभरात पोहोचवणारे अध्यात्मिक गुरु श्री चिन्मय स्वामी यांच्या ब्राँझच्या भव्य पुतळ्याचे ऑलिम्पिकच्या निमीत्ताने लंडन येथे अनावरण करण्यात आले. ऑलिम्पिक धर्तीवरील शांतता ज्योत हातात धरलेला श्री चिन्मय यांचा हा पुतळा आहे. अमेरिकेचा जगविख्यात धावपटू , नऊ सुवर्णपदके पटकावणारा कार्ल लुईस याच्या हस्ते या पुतळ्याचे अनावरण करण्यात आले.
तीस वर्षांच्या माझ्या प्रदिर्घ कारकीर्दीत श्री चिन्मय हे माझे गुरु होते. सर्व देशांमध्ये शांतता,मैत्रीचा दिव्य संदेश देणा-या ऑलिम्पिकची आठवण करून देणारा त्यांचा हा पुतळा आहे.अशा शब्दात यावेळी लुईसने आपल्या भावना व्यक्त केल्या.हा पुतळा लंडन शहराला भेट असल्याची घोषणाही त्याने यावेळी केली.याप्रसंगी माजी विश्वविक्रमी महिला मॅरेथॉन धावपटू तेगला लोरोप, आर्ट ऑफ द ऑलिम्पियन्स संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी बॉब बिमन हे उपस्थित होते.वर्ल्ड हार्मोनी रन या संस्थेच्यावतीने हा समारंभ आयोजित करण्यात आला होता. पुतळा अनावरण प्रसंगी मार्टीन ल्युथर किंग ज्युनियर यांच्या कन्या आणि किंग सेंटर च्या मुख्य कार्यकारी डॉ.बर्निस ए.किंग, आर्चबिशप डेस्मंड टूटू यांच्या कन्या रेव्हरंड एमफो टुटू , प्रसिध्द बॉक्सर महंमद अली यांच्या कन्या खलीहा अली, युनेस्कोच्या
जनरल कॉन्फरन्सचे माजी अध्यक्ष डॉ.डेव्हीडसन हेपबर्न यांची आवर्जुन हजेरी होती.अशी माहिती चिन्मय मिशनचे अशोक परुळेकर यांनी दिली.