आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Chips Lunchbox Carrier Student Dissmissed From School In Landon

लंचबॉक्समध्ये चिप्स आणल्याने लंडनमध्‍ये विद्यार्थ्याची झाली हकालपट्टी

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
लंडन - शाळेच्या सकस आहाराच्या धोरणाला फाटा देऊन आपल्या लंचबॉक्समध्ये पोषक नसलेले चिप्स आणल्यामुळे एका सहावर्षीय विद्यार्थ्याला शाळेतून निलंबित करण्यात आले आहे. रिले पिअर्सन असे त्या निलंबित करण्यात आलेल्या विद्यार्थ्याचे नाव असून लंचबॉक्समध्ये चिप्सचे पॅकेट आणल्यामुळे कोलनब्रुक प्राथमिक शाळेने त्याला चार दिवसांसाठी निलंबित केले आहे.
विद्यार्थ्याच्या लंचबॉक्समध्ये सकस आहारच असला पाहिजे, असा ब्रिटनमधील शाळांचा शिरस्ता आहे. रिले या विद्यार्थ्याने शाळेच्या या धोरणाला फाटा देऊन त्याच्या आवडीचे स्नॅक्स डब्यात आणल्यामुळे त्याला अद्दल घडवण्यासाठी चार दिवस निलंबित करण्याचा निर्णय शाळा व्यवस्थापनाने घेतला. शाळेत येणा-या विद्यार्थ्यांच्या डब्यात चॉकलेट्स, मिठाई, क्रिप्स किंवा फिझी ड्रिंक्स देऊ नयेत, असे निर्देश शाळेने पालकांना दिले होते. विद्यार्थ्यांच्या डब्यात आरोग्यासाठी पोषक आणि संतुलित आहारच असला पाहिजे, असे निर्देश असतानाही रिलेच्या डब्यात सँडविच, दही वड्या, चीज पसरवलेले स्नॅक्स वारंवार आढळून येत होते. रिले घरी पोषक आणि संतुलित आहारच घेतो, असा त्याची आई नताली मार्डले
यांचा दावा होता, पण तो शाळेने मान्य केला नाही.