आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Christian Newspaper Must Not Use 'Allah', Malaysian Court Rules

अल्‍ला' शब्‍द केवळ मुस्लिमांसाठीच- मलेशियातील न्‍यायालयाचा निर्णय

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पुत्रजया (मलेशिया) - मलेशियातील न्‍यायालयाने एका ख्रिश्‍चन वर्तमानपत्राला ईश्‍वराचा उल्‍लेख करताना 'अल्‍ला' हा शब्‍द वापरण्‍यास मनाई केली आहे. 'अल्‍ला' हा शब्‍द केवळ मुस्लिमच वापरु शकतात, असे न्‍यायालयाने निर्णय देताना स्‍पष्‍ट केले आहे.

मलेशियातील हेराल्‍ड या वृत्तपत्राबाबत तीन मुस्लिम न्‍यायाधीशांच्‍या पीठाने हा निर्णय दिला आहे. स्‍थानिक न्‍यायालयाने 2009 मध्‍ये हेराल्ड या वर्तमानपत्राला 'अल्‍ला' हा शब्‍द वापरण्‍यास परवानगी दिली होती. मात्र, तीन मुस्लिम न्यायाधीश असलेल्या अपिलीय न्‍यायालयाने हा निर्णय फिरविला. 'अल्ला' हा शब्द ख्रिश्‍चन संस्कृतीचा भाग नसल्‍याचे न्‍यायालयाने म्‍हटले आहे. परंतु, अनेक शतकांपासून मलेशियामध्‍ये ख्रिश्‍चनांकडून हा शब्‍द वापरण्‍यात येत असल्‍याची भूमिका वृत्तपत्राच्‍या वकिलांकडून न्‍यायालयात मांडण्‍यात आली. मात्र, हा युक्तीवाद न्‍यायालयाने फेटाळला. ख्रिश्चनांनी अल्‍ला शब्‍द वापरल्‍यास समुदायांमध्‍ये संभ्रम निर्माण होण्‍याचा धोका असल्‍याचे न्‍यायालयाने नमुद केले.

मलेशियातील नजीब रझाक यांच्या सरकारमध्ये स्थानिक संयुक्त मलय राष्ट्रीय संघटनेचा वरचष्मा आहे. येथील स्थानिक मलय हे कायद्याने मुस्लीम आहेत. रझाक यांच्या सरकारने अल्ला हा शब्द मुस्लीमांसाठीच असल्याची भूमिका घेत येथील स्थानिक ख्रिश्‍चन वर्तमानपत्राने तो वापरू नये, असा आदेश दिला होता. परंतु, बोर्नियो बेटावरील स्‍थानिक मलय-भाषिक ख्रिश्चनांकडून अल्‍ला हा शब्‍द अनेक शतकांपासून वापरण्‍यात येत आहे. इंडोनेशिया आणि अरब देशांमध्‍येही हा शब्‍द वापरण्‍यात येत आहे. त्‍यांना विरोध होत नाही. आम्‍ही या निर्णयाविरुद्ध मलेशियाच्‍या सर्वोच्‍च न्‍यायालयात जाऊ, असे वृत्तपत्राच्‍या वकिलांनी सांगितले. बोर्नियो येथील चर्चेसनी अल्‍ला या शब्‍दाचा वापर सुरुच ठेवणार असल्‍याचे स्‍पष्‍ट केले.