आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Christian Women Forced To Parade Naked In Pakistan

नवाज शरीफ यांच्या पक्षाच्या कार्यकर्त्यांनी ख्रिश्चन महिलांची काढली नग्न धिंड

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

इस्लामाबाद - पाकिस्तानमधील सत्तारुढ पक्ष पीएमएल-एनचे कार्यकर्ते आणि जमावाने ख्रिश्चन समुदायाच्या महिलांवर हल्ला केला आहे. एवढेच नाही तर, जमावाने सभ्यतेच्या सर्व सीमापार करत त्या महिलांना नग्न केल्याची घटना घडली आहे. आशिया मानवाधिकार आयोगाने एक पत्रक प्रसिद्ध केल्यानंतर हे प्रकरण उजेडात आले आहे.

'डेली टाईम्स'या वृत्तपत्रानुसार, तीन ख्रिश्चन महिलांना त्यांच्या घरमालकाने बेदम चोप दिला आणि त्यानंतर त्यांची नग्न धिंड काढली. पीडित अरशाद बीबी, सौरिया बीबी आणि त्यांची सून सदीक मसीह यांना घरमालक मुहम्म्द मुनीर याने मारहाण केली आणि माणुसकीला काळिमा फासणारे कृत्य केले. त्याचे वडील अब्दूल रशीद हे सत्तारुढ पक्षाचे कट्टर समर्थक आहेत.

मानवतेला काळिमा फासणारी ही घटना तीन जून रोजी घडली आहे. पीडित सादीक मसीह यांच्या मुलाचा शोध घेत जमाव त्यांच्या घरावर चालून आला. त्यावेळी फक्त महिलाच घरात होत्या. मसीह यांचा मुलगा घरी सापडला नाही याच राग आल्याने जमावाने महिलांना मारहाण सुरू केली. सत्तारुढ पक्षाच्या कार्यकर्त्यांनी महिलांना ओढत घराबाहेर आणले आणि त्यांचे कपडे फाडले. त्यानंतर धमकी देऊन त्यांना सोडून देण्यात आले. या घटनेनंतर गावक-यांनी पोलिस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली आहे.

पुढील स्लाइडमध्ये, कट्टरवाद्यांचा गैरमुस्लिमांसोबत कसा आहे व्यवहार