आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

फिलिपीन्समध्ये कुटुंब नियोजनाविरोधात ख्रिश्चनाची निदर्शने

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मनीला - फिलीपीनमधील प्रस्तावित कुटुंब नियोजन कायद्याला देशातील कॅथॉलिक पंथाने तीव्र विरोध केला आहे. लोकसंख्या नियंत्रणाच्या उपायांना विरोध करण्यासाठी हजारो नागरिक शनिवारी रस्त्यावर उतरले होते.
आंदोलनात सहभागी निदर्शकांनी लाल रंगाचा पेहराव केला होता. देशातील गरीबी कमी करण्यासाठी लोकसंख्येला आळा घालण्याचा प्रयत्न सरकारने केला आहे. त्यासाठी हा प्रस्तावित कायदा आहे. या कायद्यात दोन मुलांची सक्ती करण्यात आली आहे. सरकारच्या या प्रस्तावाला रोमन कॅथॉलिक चर्चकडून कडाडून विरोध करण्यात आला आहे.
अशा प्रकारचा कायदा करणे म्हणजे देवाच्या नियमाविरूद्ध कृती करण्यासारखे आहे, असे मत डॉली क्रूझ या 61 वर्षीय निवृत्तीधारक महिलेने व्यक्त केले. काय योग्य व काय अयोग्य हे ठरवण्याचा अधिकार देवाने मानवाला दिला आहे, असे त्या म्हणाल्या. शनिवारी झालेल्या आंदोलनात सुमारे सात हजार नागरिक सहभागी झाले होते. राष्ट्रपती बेनिग्नो अ‍ॅकिनो यांनी या प्रस्तावाचे जोरदार समर्थन केले आहे. दुसरीकडे देशाच्या जन्मदरात अलीकडे घट होत असल्याचे दिसून येत आहे.