आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Citizen Disrespect The King By Twiting ; He Arrested

ट्विटरवर राजाचा अवमान केल्या प्रकरणी कुवेती नागरिकास कैद

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

कुवेत सिटी- ट्विटरच्या माध्यमातून राजाचा अवमान आणि देशाची प्रतिमा मलिन करण्याचा ठपका ठेवून कुवेतमध्ये एका कार्यकर्त्याला न्यायालयाने दहा वर्षांची कैदेची शिक्षा ठोठावली आहे.

ओरान्स अल-रशिदी असे दोषी ठरलेल्या व्यक्तीचे नाव आहे. कुवेतचे राजे शेख साबाह अल-अहमद अल साबाह यांच्यावर टीका करता येत नाही. देशाच्या राज्यघटनेने अशी कृती बेकायदा ठरवलेली आहे. परंतु रशिदीने कायद्याचे उल्लंघन करून ट्विटर आणि यू-ट्यूबवरून त्यांचा अवमान केला. त्याचबरोबर देशाविषयी चुकीच्या माहितीचा प्रसार केला, असा ठपका त्याच्यावर ठेवण्यात आला आहे. इंधनाचे उत्पादन करणा-या आणि श्रीमंत देश अशी प्रतिमा मलिन करण्याचा प्रयत्न यातून रशिदीने केला आहे. गेल्या काही महिन्यांपासून कुवेतमध्ये इंटरनेट युजर्सला सरकारच्या संतापाचा सामना करावा लागत आहे. विरोधकांनी निवडणूक कायद्यात सुधारणा करण्याची मागणी लावून धरली आहे. त्यानंतर सरकारला विरोधाचा मुकाबला करावा लागत आहे. देशाची प्रतिमा मलिन करण्याच्या प्रकरणात कुवेतमध्ये या अगोदर अनेक कार्यकर्त्यांना तुरुंगात जावे लागले आहे.