आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

इस्लामाबादेत नागरिकांचा संसदेला घेराव

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

इस्लामाबाद - ताहिर-उल-कादरी यांच्या नेतृत्वाखाली निदर्शने करणा-या हजारो समर्थकांची मंगळवारी पोलिसांसोबत जोरदार धुमश्चक्री उडाली. ‘लोकशाहीसाठी जनतेची क्रांती’अशी घोषणा करीत कादरी यांनी हजारो समर्थकांसह इस्लामाबादेत धडक दिली. कादरी यांच्या प्रक्षोभक भाषणानंतर बिथरलेल्या जमावाने पोलिसांवर लाठ्या-काठ्यांनी हल्ले केले. या वेळी बचावासाठी पोलिसांनी अश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या व हवेत गोळीबारही केला.

कादरी यांच्या ‘तेहरीक मिनहाज-उल- कुरान ’ या पक्षाच्या वतीने निवडणूक सुधारणांची मागणी करीत शनिवारी इस्लामाबादच्या दिशेने मोर्चा सुरू केला. मंगळवारी शहराच्या अगदी मधोमध असलेल्या जिना अ‍ॅव्हेन्यूमध्ये हजारो समर्थकांसह हा मोर्चा धडकला. या वेळी कादरी यांनी प्रक्षोभक भाषण के ले. राष्ट्रीय सरकार तसेच सर्व प्रांतिक सरकारे बरखास्त करण्याची मागणी केली. लोकशाहीकरिता जनतेने ही क्रांती केली असल्याची घोषणा केली. पाकिस्तानी संसदेचे कनिष्ठ सभागृह नॅशनल असेंब्लीपासून हाकेच्या अंतरावर शांततामय मार्गाने निदर्शने करण्याचा करार कादरी यांनी सरकारसोबत केला होता. परंतु मंगळवारी त्यांनी पोलिसांचे कडे तोडून संसद चौकाच्या दिशेने कूच करा, अशी चिथावणी समर्थकांना दिली. त्यामुळे जमाव बिथरला. जमावाने पोलिसांवर दगडफेक सुरू केली.
राजकीय अस्थिरतेमुळे युद्धाचे ढग
घराबाहेर पडा, माझे हात मजबूत करा
माझे हात मजबूत करा, घराबाहेर पडा; अन्यथा पुढची पिढी माफ करणार नाही.
ताहिर-उल-कादरी, तेहरीक मिनहाज-उल-कुराण

कोण हे कादरी ?
61 वर्षीय मुहंमद ताहिर-उल-कादरी हे सुफी विचारवंत आणि पंजाब विद्यापीठातील माजी प्राध्यापक आहेत. गेल्या सात वर्षांपासून ते कॅनडात स्थायिक झाले होते. गेल्या महिन्यात ते पाकिस्तानात परतले. महिनाभर देशातील टीव्ही वाहिन्या आणि वृत्तपत्रांमध्ये जोरदार प्रचार मोहीम राबवली होती. कादरींच्या अचानक उदयामुळे राजकीय वर्तुळात आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

पुढे काय ?
* पंतप्रधानांच्या अटकेच्या आदेशाने सरकार कात्रीत
* लष्कराच्या पाठिंब्यावर कामचलाऊ सरकारची स्थापना होऊ शकते
* मे-जूनमध्ये होणा-या निवडणुका टळू शकतात

कादरीचा अजेंडा
भ्रष्ट फेडरल व प्रांतिक सरकारे उलथवणे आणि हंगामी सरकारच्या नेतृत्वाखाली नव्याने निवडणुका घेणे हा तेहरिक मिनहाज-उल-कुरानचा प्रमुख अजेंडा आहे.
आंदोलन आताच का ?
सरकार भ्रष्टाचाराच्या दलदलीत फसले आहे. राष्ट्राध्यक्ष झरदारींवर खटले आहेत. संसद व प्रांतिक मंडळांचा कार्यकाळ संपत आला आहे.