आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • City Of Brisbane Looks Like Ghost Town On G20 Summit In Australia

PICS: जाणून घ्या, का शुकशुकाट आहे G20 परिषद असलेल्या ब्रिस्बेनमध्ये

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(फोटो- ब्रिस्बेनमधील रस्त्यांवर शुकशुकाट दिसून येतो.)
ऑस्ट्रेलियाच्या ब्रिस्बेन या शहरात G20 परिषद आयोजित करण्यात आली आहे. या परिषदेला वेगवेगळ्या राष्ट्रांचे प्रमुख उपस्थित आहेत. त्यांच्या सुरक्षेसाठी चोख सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आल्याने येथील रस्ते अगदी निर्मनुष्य दिसतात. केवळ रस्तेच नव्हे तर येथील शॉपिंग मॉलही रिकामे दिसत आहेत. स्थानिक प्रशासनाने शुक्रवारी सुरक्षेची चाचणी घेतली. यावेळी यासाठी पब्लिक हॉलिडे जाहीर करण्यात आला होता. सुरक्षेत कोणतीही ढिलाई राहू नये, यासाठी ही पावले उचलण्यात आली आहेत.
यावेळी ब्रिस्बेनमधील सेंट्रल बिझनेस डिस्ट्रिक्ट पूर्णपणे रिकामे होते. रस्त्यांवर सामान्य नागरिक आणि वाहनांऐवजी पोलिसांची वाहने नजरेस पडत होती. हेलिकॉप्टरच्या माध्यमातून शहरावर लक्ष ठेवण्यात येत होते. रस्त्यांवर मोजकेच नागरिक दिसून येत होते. विशेष म्हणजे या शहरात अंड्यांवर बंदी घालण्यात आली आहे. अंडे आणि सापांच्या पुरवण्यावर बंदी घालण्यात आल्याचे समजते.
पुढील स्लाईडवर बघा, ब्रिस्बेन शहरातील शुकशुकाटाचे फोटो...