आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Clash Between Government Supporter Opposition In Thailand, Today Election

थायलंडमध्ये निवडणुकीच्या तोंडावर सरकार समर्थक-विरोधकांमध्ये संघर्ष,आज मतदान

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बँकॉक - थायलंडमध्ये सार्वत्रिक निवडणुकीच्या तोंडावर सरकार समर्थक-विरोधक यांच्यात जोरदार संघर्ष उडाला. धुमश्चक्री रोखण्यासाठी पोलिसांना गोळीबारदेखील करावा लागला. राजधानीत स्फोटाची घटना घडली.
रविवारी देशात निवडणूक होऊ घातली आहे. परंतु निवडणूक रद्द करण्याची मागणी करत विरोधक शनिवारी रस्त्यावर उतरले.
सरकार समर्थक आणि विरोधक यांच्यात संघर्ष उडाला. निवडणुकीसाठी राजधानीतील सुरक्षा व्यवस्था कडक करण्यात आली आहे. त्याला न जुमानता बंडखोर गटाने जोरदार विरोध दर्शवला. त्या वेळी सुरक्षा यंत्रणेकडून गोळीबार करण्यात आला. त्याला विरोधकांनीही गोळीबारानेच उत्तर दिले.
ही घटना बँकॉक पोस्टजवळील मॉल परिसरात घडली. त्यात किमान तिघे जखमी झाले. देशात रविवारी मतदान होणार आहे. त्यासाठी राजधानीमध्ये 2 लाख सुरक्षा जवान तैनात करण्यात आले आहेत.