आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Clashes Following Football Verdicts In Egypt Leave 28 Dead

इजिप्‍तमध्‍ये फुटबॉल चाहत्‍यांमधील हिंसेत 28 जणांचा मृत्‍यू

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

कैरो- इजिप्त येथे गेल्यावर्षी फुटबॉल सामन्यानंतर झालेल्या हिंसाप्रकरणी आज 21 जणांना मृत्यूदंडाची शिक्षा सुनावण्यात आल्यानंतर उफाळून आलेल्‍या हिंसाचारात 28 जणांचा मृत्‍यू झाला. त्‍यात दोन पोलिस कर्मचा-यांचाही समावेश आहे.

गेल्‍यावर्षी 1 फेब्रुवारीला पोर्ट सैदच्‍या अल मास्री आणि कैरो येथील अल आहली या दोन क्‍लबदरम्‍यान झालेल्‍या फुटबॉल सामन्‍यादरम्‍यान प्रचंड हिंसाचार झाला होता. त्‍यात 74 जणांचा मृत्‍यू झाला होता. याप्रकरणी आज सुनावणी झाली. सुनावणीकडे सर्वांचे लक्ष लागले होते. न्‍यायालयाने 21 जणांना फाशीची शिक्षा ठोठावातच परिसरातील जमाव हिंसक झाला. त्‍यानंतर झालेल्‍या हिंसेत 26 नागरिक आणि 2 पोलिसांचा मृत्‍यू झाला. फाशीची शिक्षा ठोठाविण्‍यात आलेले सर्व 21 जण अल मास्री क्‍लबचे चाहते होते. या क्‍लबचा 'उल्‍फा' नावाचा एक गट आहे. या गटाने होस्‍नी मुबारक यांच्‍या विरोधात झालेल्‍या निदर्शनांमध्‍ये प्रमुख भूमिका बजावली होती. फुटबॉल सामन्‍यानंतर झालेल्‍या हल्‍लयात मुबारक यांचाच हात असल्‍याचा आरोप या गटाने केला होता.