आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दांतावर किड न होऊ देणारे रसायन सापडले!

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

लंडन- लहान मुलांप्रमाणेच मोठ्यांनाही सतावणारी दातांची समस्या म्हणजे किड. किडलेल्या दातांसाठी यापुढे डॉक्टरांकडे सारख्या चकरा मारव्या लागणार नाहीत. दातांना किड लागणारच नाही,असे रसायन शास्त्रज्ञांनी शोधून काढले आहे. विशेष म्हणजे हे रसायन पदार्थांमध्ये टाकण्याची सोयही आहे. येत्या एक-दिड वर्षात हे औषध बाजारात येण्याची शक्यता आहे.
अमेरिका व चिलीच्या शास्त्रज्ञांच्या पथकाने ‘किप 32’ रसायन विकसित केले आहे. यामुळे एका मिनीटांत बॅक्टेरियांचा नाश होतो असा दावा केला आहे. बाजारात उपलब्ध असलेल्या दातांच्या विविध उत्पादनांमध्ये उदा.टूथपेस्ट, माउथवॉश, च्युईंगम मध्ये टाकल्याने दंतक्षय हद्दपार करता येईल असा दावा शास्त्रज्ञांनी केला आहे.
आपल्या तोंडातील साखरेचे लॅक्टीक अ‍ॅसिडमध्ये रुपांतर करणाºया ‘स्ट्रेप्टोकोकस म्युटन्स’ नामक जंतूचा हे नवीन रसायन नायनाट क रते.स्ट्रेप्टोकोकस जंतू दातांवरील कठीण आवरण (इनॅमल ) नष्ट करतात. ‘किप 32’ हे रसायन हे या जंतूंचाच नाश करते. या रसायनचा अन्नपदार्थांमध्येही वापर करता येईल.सात वर्षांपासून या रसायानाच्या विविध चाचण्या घेण्यात येत आहे. आता ते मनुष्यावर चाचणी करण्यात येणार असून येत्या दिड वर्षात ते बाजारात येईल असे येल विद्यापीठाचे म्हणणे आहे.