आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Cleaning Lady Steals Train And Crashes Into House

क्लीनरने रेल्वे चोरली, घरावर जाऊन धडकली!

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

स्टॉकहोम - स्वीडनमधील स्टॉकहोम शहराच्या सॉल्ट्सजोबडन उपनगरात एका वीसवर्षीय महिला सफाई कामगाराने स्थानिक रेल्वे डेपोतून रेल्वे गाडीच चोरली. चोरलेली ही रेल्वे तिने सर्व बॅरिकेड्स तोडत जवळपास दीड किलोमीटर चालवली. रेल्वे रूळ संपल्यानंतर 100 फूट अंतर ही रेल्वे रस्त्यावर घरंगळत गेली आणि एका निवासी अपार्टमेंटमध्ये घुसली. या तीन मजली अपार्टमेंटमध्ये तीन कुटुंबे राहतात. मात्र, रेल्वे घुसली तेव्हा घरात कोणीही नसल्याने सर्वजण बालंबाल बचावले. रेल्वे चोरणारी महिला सफाई कामगार मात्र जखमी झाली. या घटनेची माहिती कळताच पोलिस तातडीने घटनास्थळी आले आणि जखमी चोराला रुग्णालयात दाखल करण्यात आले.

कशी केली चोरी : महिला क्लीनरने रेल्वेची चावी मिळवली. चावी मिळताच तिने रेल्वे चालू केली आणि पळून जाण्याच्या प्रयत्नातच रेल्वे धडकली.

पुढे वाचा, इजिप्त रेल्वे अपघातात १९ ठार