आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराइस्लामाबाद - पाकिस्तान अस्थिरतेच्या गर्तेत चालले आहे. एकीकडे देशातील जनता रस्तावर येऊन सरकारच्या बर्खास्तिची मागणी करत आहे, तर दुसरीकडे पाकिस्तानच्या न्यायालयाने पंतप्रधान राजा परवेझ अश्रफ यांच्या अटकेचे आदेश दिले आहेत. त्यामुळे सरकार अडचणीत आले आहे.
भारताविरोधात सतत कटकारस्थान करत असणा-या पाकिस्तानमध्ये सध्या तणावपूर्ण वातावरण आहे. आज सकाळपासून (मंगळवार) इस्लामाबादच्या रस्त्यांवर लष्कर आणि पोलिस जवानांच्या शेकडो तुकड्या दिसत आहेत. पाकिस्तानी सरकारला 'चले जाव' म्हणत मौलवी डॉ. ताहीर-उल-कादरी यांची संघटना तहरीक मिनहाजुल कुराणने रविवारी लाहोर ते इस्लामाबाद असा लाँगमार्च काढला आहे. या मार्चला पाकिस्तानमध्ये मोठा पाठिंबा मिळत आहे.
डॉ. कादरी यांनी विधानसभा बर्खास्त करुन सरकारच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. मंगळवार सकाळी ११ वाजता पर्यंतची सरकारला मुदत देण्यात आली होती, ती आता टळून गेली आहे. त्यांच्या मोर्चात 'देश वाचवा, सरकार नाही' ही प्रमुख घोषणा दिली जात आहे. सोमवारी रात्री संसदेबाहेर जमलेल्या लाखो समर्थकांसमोर त्यांनी, जो पर्यंत सरकार बदलत नाही तो पर्यंत आंदोलन थांबणार नाही असा इशारा दिला. आता सरकार आणि डॉ. कादरी समर्थकांना त्यांची पुढची भूमिका काय असेल याची उत्सूकता लागून राहिली आहे.
इस्लामाबादमध्ये आलेल्या ऐतिहासिक लाँगमार्चला संबोधित करताना डॉ. कादरी म्हणाले, पाकिस्तान आईन मधील (घटना) कलम ४० नुसार पाकिस्तान सरकारवर जबाबदारी आहे की, त्यांनी देश आणि जगामध्ये शांती प्रस्थापित केली पाहिजे. मात्र, वास्तव काही वेगळेच आहे. शांततेचा संदेश देश आणि जगात पोहचवण्यास ते अपयशी ठरले आहेत.
मौलवी डॉ. कादरी म्हणाले, देशात जेवढा गैरमुस्लिम समाज असेल मग तो हिंदू, शिख किंवा ख्रिश्चन असेल, त्याच्या जीविताचे आणि साधन संपत्तीचे रक्षण करण्याची जबाबदारी आमच्यावर आहे. मात्र, आमचे सरकार यात सपशेल अपयशी ठरले आहे. ज्या देशात सव्वाशे मृतदेह चार दिवस पडून राहातात त्या देशाच्या सरकारला संसदेत बसण्याचा अधिकार नाही.
(पाकिस्तानचे पंतप्रधान राजा परवेझ अश्रफ यांना ज्या रेंटल पॉवर प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाने अटक करण्याचे आदेश दिले आहे. काय आहे हे, रेंटल पॉवर प्रकरण ? वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.