आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Cleric Leads Thousands In Pakistan Protest March

कादरींशी चर्चेची सरकारची तयारी; झरदारींनी बोलावले संसदेचे सत्र

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

इस्लामाबाद - गेल्या चार दिवसांपासून संसदेला घेराव घालणारे मौलवी ताहिर उल कादरी यांच्याशी पाकिस्तान सरकारने अखेर चर्चेची गुरुवारी तयारी दाखवली. सरकारने धार्मिक व्यवहारविषयक मंत्र्यांसह चार सदस्यांची एक समिती स्थापन केली आहे. त्यावर कादरी यांनीदेखील आपल्या अल्टिमेटमची र्मयादा वाढवली आहे. कादरींनी संसद आणि विधानसभेला भंग करण्यासाठी सरकारला अल्टिमेटम देत आहेत. चार दिवसांपासून त्यांनी अनेक वेळा अल्टिमेटमची र्मयादा वाढवली आहे. पंतप्रधानांनी संकटाचा अंदाज घेऊन समितीची स्थापना केली आहे. त्याचबरोबर कादरींशी चर्चा करण्याचे आदेश दिले.

राज्यघटनेच्या कक्षेत शर्ती मान्य करणे अशक्य

कादरी यांच्या अटी राज्य घटनेच्या कक्षेत मान्य करणे केवळ अशक्य आहे. लोकशाहीला बाजूला करण्याची कोणतीही घटनाबाह्य मागणी मान्य केली जाऊ शकत नाही, असे माहिती मंत्री कमर जमान कैरा यांनी स्पष्ट केले आहे.

लेखी समझोता हवा
लेखी समझोता होत नाही तोपर्यंत आंदोलन सुरूच राहील, अशी भूमिका त्यांच्या सर्मथकांनी घेतली आहे. सत्ताधारी पाकिस्तान पीपल्स पार्टीसह सर्व पक्षांचे प्रतिनिधी भेटण्यास येणार आहेत. या बैठकीत आपल्या मागण्यांवर विचार करण्याचे आश्वासन देण्यात येणार आहे. चर्चा, शांती, लोकशाहीला शेवटची संधी दिली गेली पाहिजे. असे कादरी सर्मथकांचे म्हणणे आहे.

सरकारी समिती
1. धार्मिक प्रकरणांचे फेडरल मंत्री खुर्शीद शाह

2. पीएमएल क्यूचे प्रमुख चौधरी शुजाअत हुसैन.

3. मुत्ताहिदा कौमी मुव्हमेंटचे वरिष्ठ नेते फारूक सत्तार.

4. अवामी नॅशनल पार्टीचे अफरसियाब खटक.

स्वत:ला हिटर आणि सर्मथकांना थंडी, पाऊस
कादरी स्वत: बुलेटप्रूफ कवचामध्ये आहेत. त्यांच्याजवळ हिटर आहे; परंतु त्यांच्या सर्मथकांना मात्र कडाक्याच्या थंडीत रस्त्यावर राहावे लागत आहे. दोन दिवसांपासून मीडिया आणि सोशल मीडियातून कादरी यांच्यावर टीका होत आहे.