आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Cleric Tahir ul Qadri's Supporters Clash With Police

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

शरीफांविरुद्ध क्रांती करण्यासाठी मौलवी कॅनडाहून मायदेशी, पाकमध्ये राडेबाजी

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
इस्लामाबाद - पाकिस्तानी वंशाचा कॅनडा येथील फुटीरतावादी मौलवी ताहिर-उल- कादरीचा क्रांती आंदोलनाचे नेतृत्व करण्यासाठी इस्लामाबादेत येण्याचा मनसुबा सोमवारी उधळण्यात आला. कादरीचे इस्लामाबादला जाणारे विमान लाहोरकडे वळवण्यात आले. विमान इस्लामाबादला न्यावे किंवा लष्कराने सुरक्षा कोठडी घेण्याच्या मागणीसाठी कादरी अडून होता. यादरम्यान पंजाबच्या राज्यपालांच्या यशस्वी वाटाघाटीनंतर विमान लाहोरकडे वळवण्यात आले. कादरी यांच्यावरून उद्भवलेल्या हाय ड्रामात त्याच्या सर्मथकांत व सुरक्षा जवानांत चकमक उडाली. यामध्ये शेकडो लोक जखमी झाले.
63 वर्षीय कादरीने गेल्या वर्षी जानेवारी महिन्यात निवडणूक सुधारणा कार्यक्रमासाठी हजारो सर्मथकांसह निदर्शने केली होती. कादरीच्या इस्लामाबादेतील प्रवेशामुळे हिंसाचार उसळण्याची शक्यता पाहता सुरक्षा जवानांनी त्याला लाहोरमध्ये रोखले. पंजाबचे राज्यपाल चौधरी मुहंमद सरवर यांनी विमानात यशस्वी वाटाघाटी केल्या.

लष्करावर विश्वास, पीएमएल-एन खुनी
कादरीने गेल्या वर्षी हजारो सर्मथकांसह निवडणूक पुढे ढकलण्यासाठी निदर्शने केली होती. कादरीने विमानातून उतरण्यास नकार दिला. लष्करी अधिकार्‍यांनी कोठडी घेण्याच्या मुद्दय़ावर तो अडून होता. शरीफ सरकार सर्मथकांचे खुनी असल्याने त्यांच्यावर विश्वास नाही. आपण फक्त लष्कराचेच ऐकू, अशी भूमिका कादरीने घेतली होती.

गेल्या आठवड्यातही झाली चकमक
कादरीच्या पाकिस्तान अवामी तेहरिक (पीएटी) पक्षाच्या कार्यकर्त्यांनी लाहोर विमानतळाबाहेर गर्दी केली होती. कादरीला दुहेरी नागरिकत्व आहे. नवाझ शरीफ सरकारविरुद्ध क्रांती करण्यासाठी तो येथे आला आहे. गेल्या आठवड्यात पोलिसांसोबत उसळलेल्या चकमकीत दोन महिलांसह कादरीचे दहा सर्मथक ठार झाले होते.

कादरीला खासगी सुरक्षा
कादरीची स्थलांतर रहिवासी खात्यातील कार्यालयीन प्रक्रिया पूर्ण झाली असून तो आपल्या घरी जाण्याच्या तयारीत असल्याचे जिओ टीव्हीच्या वृत्तात म्हटले आहे. सरवर यांच्या सरकारी कारमधून कादरी रवाना झाला. त्याने सरकारी सुरक्षा घेण्यास नकार दिल्यामुळे खासगी सुरक्षा रक्षक सज्ज ठेवण्यात आले होते.