आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मंगळावरील ढग पृथ्वीवर अवतरले

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

वॉशिंग्टन - परग्रहावरील जीवनाचा शोध घेण्याचे विज्ञानाचे प्रयत्न सुरू असतानाच अमेरिकेतील संशोधकांना मंगळ ग्रहावरील वातावरणाचा वेध घेण्यात काही प्रमाणात यश आले आहे. संशोधकांनी कृत्रिम ढग तयार केले आहेत. हे ढग अगदी मंगळ ग्रहावरील ढगाप्रमाणेच आहेत.


त्यासाठी एक चेंबर तयार करण्यात आले आहे. त्यात मंगळ ग्रहावरील वातावरण निर्माण केले आहे. चेंबरमध्ये आर्द्रता खूप अधिक आहे. पृथ्वीच्या तुलनेत ती 190 टक्के अधिक आहे. कृत्रिम ढगातून विशिष्ट किरणे सोडण्यात आली आहेत. यातून ढगांची रचना नेमकी कशा प्रकारे आहे, हे जाणून घेण्यात येणार आहे. अर्थात वातावरणातून पाण्याचे वहन करण्याची नेमकी पद्धत काय आहे, हे लक्षात घेण्याचा प्रयत्न आहे, असे मॅसाच्युसेट्स इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी (एमआयटी) संस्थेचे प्रोफेसर डॅन झिकझो यांनी सांगितले. झिकझो यांच्या टीमने एका आठवड्यात 10 ढग तयार केले. प्रत्येक ढगाला तयार होण्यासाठी 15 मिनिटांचा कालावधी लागला.