आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भारतासह अमेरिका, इंग्लंडकडे माहिती असूनही टाळता आला नाही मुंबईतील 26/11चा हल्ला

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(फाईल फोटो)
मुंबईवर झालेला 26/11 चा दहशतवादी हल्ला होण्यापूर्वीच त्यासंबंधीच्या काही टिप्स भारतासह अमेरिका आणि इंग्लंडसारख्या बड्या देशांना मिळाल्या होत्या. पण तरीही हा हल्ला रोखण्यात यश आले नसल्याची माहिती नुकतीच उघड झाली आहे. हल्ला होणार असल्याबाबत तिन्ही देशांकडे माहिती होती. पण एकमेकांबरोबर ही माहिती शेअर केली नसल्यामुळे कट उघड होऊ शकला नाही, असे समोर आले आहे.

2008 मध्ये झरार शाह नावाचा एक कॉम्प्युटर एक्सपर्ट पाकिस्तानातील एका सुरक्षित ठिकाणी बसून देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईवर हल्ल्याचा कट रचत होता. लश्कर ए तोयबाचा तंत्रज्ञान प्रमुख असलेल्या शाह आणि कारस्थान रचणा-या इतरांनी हल्ला करणा-या दहशतवाद्यांना मार्ग आणि हल्ल्याची ठिकाणे दाखवण्यासाठी गूगल अर्थचा वापर केला होता. पत्ता लागू नये म्हणून माहिती देण्यासाठी इंटरनेट फोन सिस्टीमचा वापर करत फोन न्यू जर्सीहून होत असल्याचे भासवले. हल्ल्याच्या काही कालावधीपूर्वी पूर्वीच शाह याने इंटरनेटनवर ज्युविश हॉस्टेल आणि दोन मोठ्या ह़ॉटेल्सबद्दल माहिती शोधली होती. ही सर्व हल्ला झालेली ठिकाणे होती.

हे सर्व करत असतानाच सप्टेंबर महिन्यात ब्रिटीश गुप्तचर संस्थांची नजर त्याच्या अनेक ऑनलाईन हालचालींवर होती. ते शाहचे इंटरनेट सर्चेस आणि संदेश ट्रॅक करत होते. अमेरिका आणि भारताच्या माजी अधिका-यांनी दिलेली माहिती आणी एडवर्ड स्नोडेन यांनी ही माहिती दिली आहे. त्याचप्रमाणए भारतीय गुप्तचर संस्थांनीही त्याला ट्रॅक केले होते. हल्ल्यानंतर देण्यात आलेल्या माहितीमध्ये हे उघड झाले होते. पण या दोन संस्थांना माहिती असल्याचे अमेरिकेला माहिती नव्हते. तरीही हल्ला होणार अशी माहिती मिळाल्यानंतर भारताला सूचना देण्यात आल्याचे अमेरिकेच्या तत्कालीन अधिका-यांनी म्हटले होते.

यानंतर काय झाले ते संपूर्ण जगानेच पाहिले. या हल्ल्यासंदर्भात तिनही देशांना जी काही माहिती किंवा टिप्स मिळाल्या होत्या त्याचा जर एकत्रितपणे अभ्यास केला असता तर हा हल्ला टाळता आला असता असेही, मत अधिका-यांनी व्यक्त केले आहे.

पुढे वाचा, हल्ल्यानंतर शेअर केली माहिती...
(Source-NYT)