आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Coast Of Japan Due To Tsunami Devastated Included In Google Street, Divya Marathi

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

जपानमध्‍ये आलेल्या विध्‍वंसक सुनामीची छायाचित्रे दिसणार आता \'गुगल स्ट्रीट\'वर

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जपानमध्‍ये मार्च 2011 साली आलेल्या सुनामींने सर्व जगाचे लक्ष आपल्याकडे वेधले होते. काही क्षणात अनेक शहरांचे मोठ्याप्रमाणावर नुकसान झाले होते. समुद्र किना-यावर वसलेल्या शाळा, हॉटेल्स, संस्था आणि निवासी इमारती उद्ध्‍वस्त झाल्या होत्या. जपानच्या कोणत्या भागात सुनामीचे संकट उद्भवले होते ती ठिकाणे गुगल आपल्या 'स्ट्रीट व्ह्यू फ्रॉम दि ओशन' या कार्यक्रमा अंतर्गत कॅमे-यात कैद केले आहे. या कार्यक्रमासाठी गुगलने अत्याधुनिक कॅमे-यांनी सज्ज असलेले जहाज जपानच्या ईशान्य किना-यावर पाठवले आहे.
सुनामीमुळे उध्‍दवस्त झालेल्या इमारतींची फोटोज अगोदरच घेण्‍यात आली आहे. जानेवारी 2015 साली गुगल अर्थ या सॉफ्टवेअरच्या माध्‍यमातून ती छायाचित्रे सर्वांना पाहावयास उपलब्ध होतील, असा अंदाज वर्तवला जात आहे. सुनामींने जपानचे प्रमुख असे फुकूशिमा अणुऊर्जा केंद्राला मोठे नुकसान पोहोचवले होते. यानंतर हे केंद्र चेर्नोबिलसारखे उजाड पडले आहे. विषारी वायूचा परिणाम होईल म्हणून येथे मानवी हालचाली होताना दिसत नाही.

पुढील स्लाइड्सवर पाहा जपानमध्‍ये सुनामीने केलेले नुकसान.....

सोर्स- ajw.asahi.com