कित्येक रंगाच्या छटांसह केनो क्रिस्टल ही जगातील सर्वात जास्त सुंदर नदी आहे. या नदीच्या प्रवाहात लाल, पिवळा, हिरवा, निळा, आणि काळा असे विविध रंग दिसतात यामुळे या नदीला 'रिवर ऑफ फाइव कलर' असे ही म्हणतात. ही नदी कोलंबियात आहे. या नदीत फुलणा-या फुलांच्या रंगामुळे ही नदी अशी रंगीबिरंगी दिसते.
नदीतील पाणी कमी होताच मॅकरेनिया क्लेविग्रा नावाची रोपटी उगवतात ज्यामुळे नदीचा रंग फिकट गुलाबी दिसतो. हे रोपटे आर्धे पाण्यात असतात तर आर्धे पाण्यावर असतात. विविध रंगाच्या फुलांमुळे ही नदी आकर्षक दिसते. या केनो क्रिस्टल नदीच्या जवळ असणा-या टेकड्यांवर 420 प्रकारचे पक्षी आणि 10 प्रकारचे जलचर प्राणी आणि अनेक जीव पाहायला मिळतात.
100 किमी पेक्षाही कमी लांब असणारी ही नदी पाहणे देखील एक सोहळाच आहे. ही नदी पाहण्यासाठी विलाविसेनसीओपासून मॅकरेनापर्यंत विमानाने प्रवास करावा लागतो. त्यानंतर जंगलात असणारी ही नदी पाहण्यासाठी जहाजची मदत घ्यावी लागते. हा खडतर प्रवासपूर्ण करत नदीपर्यंत पोहचलेला फोटोग्राफर ओलिवर ग्रुनवाल्ड याने केनो क्रिस्टल नदीचे मनमोहक फोटो कॅमे-यात कैद केले आहेत.
केनो क्रिस्टलचे फोटो पाहण्यासाठी पुढील स्लाइडवर क्लिक करा...